Atik Ahmed कोण होता? कसा बनला गँगस्टर… 17 व्या वर्षी पहिली हत्या ते गुन्हेगारी जगतातील डॉन

Atik Ahmed Shot Dead : गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद  (Ashraf Ahmed) यांची प्रयागराजमध्ये (Prayagraj) गोळ्या झाडून हत्या करण्याता आली. दोघंही पोलिसांच्या ताब्यात होते. पोलीस दोघांनाही घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ते पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देत होते. याचवेळी अचानक आलेल्या तीन हल्लेखोरांनी अतीक आणि अशरफला गोळ्या झाडून ठार केलं. अतीकच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर अशरफवरही गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्याच समोरच हा हल्ला झाला. 

कोण होता अतीक?
अतीक अहमद हे उत्तप्रदेशमधल्या (UttarPradesh) गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव होतं. गुन्हेगारी विश्व असो की राजकीय विश्व अतीक जे बोलत होता तेच होत होतं.  केवळ प्रयागराजचन नाही तर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये त्याची दहशत होती. असं बोललं जातं की अतीक ज्या जमीन, घर किंवा बंगल्यावर हात ठेवत होता, त्यांचे मालक ते हक्क सोडून निघून जात होते. 

वडील टांगा चालवायचे
10 ऑगस्ट 1962 ला इलाहाबादमध्ये अती अहमदचा जन्म झाला. अतीकचे वडील फिरोज अहमद टांगा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. अतीक घराजवळच असलेल्या शाळेत शिकत होता. पण त्याला शिक्षणात फारशी रुची नव्हती. 10 वीत नापास झाल्यानंतर तो काही वाईट मुलांच्या संगतीत आला. झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने मित्रांबरोबर दरोडे, अपहरणासारखे गुन्हे करायला सुरुवात झाली. पवयाच्या 17 व्या वर्षी अतीकच्या नावावर हत्येचा पहिला गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा :  मधुमेहांच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे ‘हा’ पेय, उच्च रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

त्या काळात इलाहाबादमध्ये चांद बाबा नावाच्या आरोपीची दहशत होती. सामान्य नागरिक, पोलीस आणि राजकीय नेतेही चांद बाबाला वैतागरे होते. अतीकने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि त्याने पोलीस आणि राजकीय नेत्यांशी जवळीक साधत चांद बाबाविरोधात श्ड्डू ठोकला. काही दिवसात अतीक चांद बाबापेक्षा मोठा गुंड बनला. याला काही अंशी पोलीसांचा वरदहस्तही कारणीभूत ठरला.

1989 मध्ये राजकारणात प्रवेश
एका गुन्ह्यात 1986 मध्ये अतीक अहमदला पोलिसांनी अटक केली. पण अतीकचे राजकीय संबंध चांगले होते. दिल्लीतून एक फोन आला आणि अतीक तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातून सुटल्यानंतर अतीकने 1989 मध्या राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. इलाहाबाद शहर पश्चिमी मतदारसंघातून त्याने विधासभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्याचा मुकाबला चांद बाबाशी होती. दोघांमध्ये गँगवॉर सुरु झाला. परिसरात अतीकची इतकी दहशत होती की अतीक निवडणुकीत विजयी झाला. त्यानंतर काही दिवसांनीच भर चौकात दिवसाढवळ्या चांद बाबाची हत्या झाली.

सलग पाच वेळा आमदार
चांद बाबाच्या हत्येनंतर इलाहाबादच नाही तर पूर्ण पूर्वांचलममध्ये गुन्हेगारी विश्वात अतीक अहमदचा दबदबा तयार झाला.  1995 मधल्या लखनऊ गाजलेल्या गेस्ट हाऊस कांडात अतीकच नवा समोर आलं. 1996 मध्ये अतीक सपाच्या तिकिटावर आमदार झाला. त्यानंतर 1999 मधअये अपना दलच्या तिकिटावर निवडणुक लढवली पण त्याला पराभव स्विकारावा लागला. 2002 मध्ये इलाहाबाद पश्चिमी मतदारसंघातून अतीक पाचव्यांदा आमदार बनला.

हेही वाचा :  Atique Ashraf Murder Case : अतिक-अश्रफ हत्याकांडप्रकरणी मोठे खुलासे! अतिक अहमदच्या डोक्यात गोळ्या झाडणारे...

8 ऑगस्टा 2002 मध्ये मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना अतीकला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला कोर्टात नेत असताना त्याच्यावर विरोधी टोळ्यांकडून गोळ्या झाडण्यात आल्या तसंच बॉम्बही हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यात अतीक जखमी झाला पण त्याचा जीव वाचला. त्यानंतर मायावती या अतीकला मारु इच्छितात असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत अतीक अहमद सपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकला. 

अतीक अहमदवर शंभरहून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. यात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. 1989 मध्ये चांद बाबाची हत्या, 2002 मध्ये नस्सनची हत्या, 2004 मध्ये मुरली मनोहर जोशींचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या भाजप नेते अशरफ यांची हत्या, 2005 मधअेय राजू पाल हत्या असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. 

योगी सरकार आल्यानंतर समस्या वाढल्या
2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले. योगी मुख्यमंत्री बनताच अतीकविरोधात चौकशी सुरु करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत अतीकच्या जवळपास 1600 कोटी रुपयांहून जास्त संपत्तीवर बुलडोझर चालवण्यात आला. अतीकची चार मुलं आहेत, त्यापैकी दोन मुलं बाल सुधारगृहात बंद आहेत. मोठा मुलगा असद याची उमेश पाल हत्याकांडात पोलीस एन्काऊंटरमध्ये हत्या झाली. तर एक जण तुरुंगात बंद आहे. 

हेही वाचा :  लग्नाचे दागिने खरेदी करायचेत; सोनं स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील आजचा दर वाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …