Sudha Murthy: कामगारांना पगार नाही म्हणून पतीसाठी सुधा मूर्तींनी पुढे केल्या सोन्याच्या बांगड्या, कलियुगात सीतेची झलक

Relationship Tips :लग्न प्रत्येकाच्या आयुष्याती खूप महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. पण असं म्हणतात ना जोडीदार समजूतदार असेल तर आयष्याचे सोने होते. जर समजूतदार जोडीदार मिळाला नाही तर आयुष्यभर फक्त तडजोड करावी लागते. एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
पण आज कालच्या जगात गोष्टी फार बदल्या आहेत. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही. पण या कलियुगात नारायण आणि सुधा मूर्ती यांची जोडी आपल्याला आयुष्याचे खरे रहस्य सांगून जाते. या दोघांचे नाते आपल्याला खरोखरचं कपल गोल्स देतात.
काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता. आयुष्यात नेहमी चांगलेच दिवस असतील असे नाही त्यामुळे तुमच्या जोडीदाराला साथ द्या. असाच एक अनुभव सुधा मूर्ती यांनी शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :- @sudha_murthy_official) ​

हेही वाचा :  माझी कहाणी : मित्राला हॉटेलच्या एका रूममध्ये एकांतात भेटणं मला पडलं महागात कारण…!

काय आहे तो किस्सा

काय आहे तो किस्सा

आयुष्यात नेहमी चांगले दिवसच येतील असे नाही. हे समजवून सांगताना सुधा मूर्ती सांगतात की इंफोसिसच्या सुरुवातीच्या दिवसात ही गोष्ट आहे. दिवाळीच्या दिवसात आम्हाला चेक तर मिळाला होता पण दिवळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने चेक बॅंकमध्ये टाकता आला नाही अशात कामगारांना पगार कसा देणार या विचारात नारायण मूर्ती असतानाच सुधा मूर्तींना त्याचे दु:ख बघवले नाही. कामगारांना पगार मिळाला तरच दिवाळी साजरी करु शकतील. त्यांना पगार तर मिळेल पण तेव्हा दिवळी संपलेली असेल असे नारायण मूर्तींने सांगितले. यावेळी सुधा मूर्तींनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या नारायण मूर्तींना दिल्या. रामयणामध्ये देखील असा उल्लेख मिळतो जेव्हा प्रभु राम संकटामध्ये होते तेव्हा सीता मातेने त्याचे दागिने पुढे केले होते. या कलियुगात असे उदाहरण तुम्हाला कुठे मिळेल.

(वाचा :- Mansi Naik ने सांगितले घटस्फोटामागील खरं कारण, या गोष्टींचा वापर करुन वाचवा तुमचे लग्न)​

एकमेकांच्या गोष्टींचा आदर करा

एकमेकांच्या गोष्टींचा आदर करा

सुधा मूर्तींनी एका मुलाखती दरम्यान सुखी आयुष्याचे रहस्य सांगितले आहे. दोन व्यक्तीचे विचार वेगळे असतात ते कधीच एकमेकांसारखे नसतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. यामुळे तुमच्या नाते दिर्घकाळ काळ टिकेल.

हेही वाचा :  एकाचवेळी एक नाही तर अनेक मुली माझी पत्नी बनण्यास तयार झाल्या, अचानक एक भयंकर प्रसंग ओढावला व सा-याची माती झाली

(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप)

सुधा मूर्तींनी सांगितला किस्सा

एकमेकांवर नियंत्रण ठेवू नका

एकमेकांवर नियंत्रण ठेवू नका

नात्यात स्पेस देणं महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवनामागे हे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एकमेकांच्या आवडीचा आदर करा. यासाठी एकमेकांवर नियंत्रण ठेवू नका. प्रत्येकाला त्यांचे स्वतंत्र हवे असते त्यामुळे एकमेकांवर नियंत्रण ठेवू नका.
(वाचा :- ऋजुता दिवेकरने दिल्या रिलेशनशिप टिप्स म्हणाल्या अशा डाएटपेक्षा खाण्याबद्दल बोलणाऱ्या जोडीदाराला शोधा)

एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवणे

एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवणे

तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या जीवनाची तुलना इतरांसोबत करु नका. तुम्ही आनंदी राहण्याची प्रयत्न करा. तुमची स्पर्धा स्वत:शी आहे त्यामुळे प्रत्येक दिवसापेक्षा चांगले वागण्याचा प्रयत्न करा.एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवा त्यामुळे तुमच्यात प्रेम वाढू शकेल.

सकारात्मक विचारसरणी

सकारात्मक विचारसरणी

ज्या व्यक्तीचा विचारसरणी सकारात्मक आहे अशा व्यक्तीसोबत तुम्ही उत्तम वैवाहिक आयुष्य जगू शकता. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुम्ही आयुष्यात खूप काही साध्य करु शकता. आयुष्यात काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडू नका.

एक टीम म्हणून काम करा

एक टीम म्हणून काम करा

भांडण झाल्यावर एकमेकांच्या विरुद्ध उभं राहण्यापेक्षा एक टीम म्हणून काम करा. यामुळे तुमच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. या गोष्टीमुळे तु्मचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. एकमेकांच्या आवडी निवडी समजून घ्या. आपल्याला कोणतरी समजून घेत आहे ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे.

हेही वाचा :  लग्नाआधी बायकोविषयी काही माहीत नव्हतं, नंतर समोर आलं खरं भयाण रूप, आता मी अडकलोय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …