रोमान्सच्यापुढे ही नात्यात खूप काही, सुधा मूर्तीनीं सांगितले सुखी जीवनाचे रहस्य

Relationship Tips : आयुष्यात लग्न झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. एखाद्या नव्या व्यक्तीला आयुष्यात जागा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नाते जपण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशात जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही. आजकालची नाती एवढी लवकर का मोडतात या प्रश्नाचे उत्तरे लेखिका सुधा मूर्ती यांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहेत. त्यांच्या मते अवास्तवी अपेक्षा ठेवल्याने नाती फार काळासाठी टिकत नाहीत. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची संकल्पनाच बदल्यामुळे ही गोष्ट होत असावी असं त्यांचं मतं आहे. आपल्या प्रियकराने आपल्या सर्व गोष्ट गोष्टी ऐकाव्यात त्याच प्रमाणे नेहमी आपल्यासोबत राहावे आपलाच विचार करावा असे विचार असल्याने आज कालची नाती फार काळ टिकताना दिसत नाही. कोणतही नात्यात रोमान्सच्यापुढे ही अनेक गोष्टी असतात. आजकालच्या नात्यांमध्ये एकमेकांचा सन्मान, आदर या सर्वगोष्टी दुय्यम स्थानावर ठेवल्या जातात त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि शुल्लक कारणांमुळे ही असे नातं तुटू शकते. यासाठी तुम्ही सुधा मूर्ती यांनी सांगितल्या या काही गोष्टी लक्षात घेऊ शकता. (फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पागल असतात मुली, 5 महिलांनी सांगितले मोठ्या पुरूषांच्या प्रेमात का घायाळ असते मन

relationship

relationship

प्रेम

तुम्हाला प्रेमाची खरी व्याख्या कळाल्यानंतर तुमच्या आयुष्यातील बऱ्याच अडचणींवर तुम्ही मात करु शकता. प्रेम म्हणजे बंधने नसून एखाद्या व्यक्तीला तो आहे तसा स्वीकारणे होय. अनेकदा प्रेमात आपण जोडीदाराकडून खूप अपेक्षा करतो. त्याने आपल्यासोबत खूप प्रेमाने वागावे नेहमी आपल्या सोबत राहावे रोमॉंटिक व्हावे असे अनेकांना वाटत असते. तसे न झाल्यास काही लोक खूप दु:खात असतात. पण अशा व्यक्तींच्या अपेक्षाच त्यांना दु:खात टाकतात. त्यामुळे आयुष्यात इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा यामुळे तुम्हाला फायदाच होईल.

(वाचा :- 14 वर्षांनी शरद केळकरने मान्य केले बायकोच देते खर्चाला पैसे,लव्हस्टोरी वाचून तुम्ही ही म्हणाल जोडी नंबर 1)

​मनातील ​गोष्टी शेअर करणे

आपल्या जोडीदाराच्या मनात काय चालू असंत हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. पण आज काल लोक फोन आणि कामात एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या जवळच्या लोकांची किंमत खूप कमी झाली आहे. आपल्या व्यक्तीसोबत गोष्टी शेअर करणे त्यांना कळतच नाही. तुम्ही जर तुमच्या मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यात तर तुमच्यातील प्रेम कायम राहण्यास मदत होईल. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या रोमॉन्सपेक्षा तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला क्वालिटी टाइम खूप महत्त्वाचा असते. पुढे सुधा मूर्ती म्हणतात की तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार तुमच्या सोबत किती वेळ आहे यापेक्षा तो तुमच्यासोबत आहे या गोष्टीवर लक्ष द्या.

हेही वाचा :  उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

(वाचा :- ताहिरा कश्यप चक्क विसरली लग्नाचा वाढदिवस, तुम्हीही आयुष्यातील महत्त्वाचे दिवस विसारता का ? मग या गोष्टी करा)

​​माणसात गुंतवणुक करा

अनेक जण पैसा पाहतात. पण तुम्ही आयुष्यात माणसांमध्ये गुंतवणुक करणे गरजेचं आहे. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. पैसा किंवा संपत्ती यागोष्टी आयुष्यभर पुरत नाहीत. त्यामुळे माणसांमध्ये गुंतवणुक करा.

(वाचा :- 14 वर्षांनी शरद केळकरने मान्य केले बायकोच देते खर्चाला पैसे,लव्हस्टोरी वाचून तुम्ही ही म्हणाल जोडी नंबर 1)

​वास्तवात राहा

चित्रपट पाहून तुमच्या अपेक्षा वाढवू नका. आयुष्य वास्तवात जागायला शिका यामुळे जर आयुष्यात दु:ख आली तरी आपल्या मनाची तयारी असते.

(वाचा :- एक लग्न मोडलं, 13 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रदीप यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली IAS टीना जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी)

​​एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवणे

तुमच्या जीवनाची तुलना इतरांसोबत करु नका. तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तुमची स्पर्धा स्वत:शी आहे त्यामुळे प्रत्येक दिवसापेक्षा चांगले वागण्याचा प्रयत्न करा.एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवा त्यामुळे तुमच्यात प्रेम वाढू शकेल.

हेही वाचा :  नवाझुद्धीन सिद्दीकीने अखरे सोडले मौन, नात्यात पुरूषही फरफटले जातात

(वाचा :- जग काय म्हणेल? या भीतीने दोन वर्ष लपून भेटत होत्या, पण सर्वकाही झुगारुन २ सौंदर्यवतींनी केला समलैंगिक विवाह)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून …