एकाचवेळी एक नाही तर अनेक मुली माझी पत्नी बनण्यास तयार झाल्या, अचानक एक भयंकर प्रसंग ओढावला व सा-याची माती झाली

प्रश्न: मी 29 वर्षांचा अविवाहित पुरुष आहे. मला अजूनही मला हवे तसे खरे प्रेम मिळालेले नाही. मी अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. पण माझे प्रत्येक नाते कोणत्या न कोणत्या वळणावर येऊन ब्रेकअप होऊन संपले आहे. खरे सांगायचे तर प्रेमाच्या बाबतीत मी खूप दुर्दैवी आहे. मी प्रेमात आहे असे मला वाटत असतानाच माझी जोडीदार मला फसवायची. नात्यात फसवणूक झाल्याचे एकदा नाही तर अनेकदा माझ्यासोबत घडले आहे. माझा खऱ्या प्रेमावरचा माझा विश्वास कमी होण्यामागे हे देखील एक कारण आहे. यामुळे मला कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत.

मला भीती आहे की ही परिस्थिती काळानुसार आणखी वाईट होईल पण माझा आता या गोष्टीवरून विश्वास उडाला आहे. एकीकडे मी असं अविचार करतो आहे आणि दुसरीकडे माझ्या पालकांनी माझ्यासाठी मुलगी शोधण्यास सुरुवात देखील केली आहे. पण माझे भूतकाळातील अनुभव पाहता मला माहित नाही की मी कधी कोणावर विश्वास ठेवू शकेन का आणि या जगात खरे प्रेम नावाची गोष्ट खरंच काही आहे का? मला समजत नाही मी काय करावे? मी लग्न करावे की ब्रेक घ्यावा? (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.) (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

जाणकारांचे उत्तर

जाणकारांचे उत्तर

मुंबई मधील समुपदेशन मानसशास्त्रज्ञ आणि डान्स मूव्हमेंट थेरपी प्रॅक्टिशनर, जानखना जोशी म्हणतात की, रोमँटिक संबंधांमध्ये वारंवार होणार्‍या विश्वासघातामुळे प्रेम या शब्दाचा द्वेष होऊ लागतो. अशा स्थितीत नात्याचा भ्रमनिरास होणे अगदी सामान्य आहे. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्यामागे अनेक कारणे आहेत. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम, आपण आपल्या विचारांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळी नात्यात तुमची फसवणूक झाली आहे. अशा परिस्थितीत, निरोगी विवाहित नातेसंबंधाची अपेक्षा करणे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे हे मी सुद्धा समजू शकतो.

(वाचा :- आयुष्यात सर्वच वाईट व निगेटिव्ह लोक भेटतात म्हणून आहात चिंतीत? मग असं होण्यामागची ही कारणं तुम्हाला माहितच हवी)​

स्वत:वर लक्ष द्या

स्वत:वर लक्ष द्या

जेव्हा पहिल्यांदा प्रेमात फसवणूक झाली, तेव्हाच त्यावर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करायला हवी होती. ट्रीटमेंट म्हणजे माझा अर्थ आहे की तुम्ही स्वत:वर काम करायला हवे होते. यामुळे तुम्हाला नातेसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत झाली असती. आपण आपल्या वेदना ह्या विश्वासाने कमी करतो की एक ना एक दिवस आपली वेदना कमी होईल. पण म्हणतात न की काही जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. तुमच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. अजुनही वेळ गेलेली नाही, तुम्ही स्वत:वर लक्ष द्यायला हवे आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा.

(वाचा :- लग्न केल्याचा आयुष्यभर होईल पश्चाताप आणि मॅरिड लाईफ होईल पार बरबाद, जर या 4 गोष्टींवर वेळीच दिलं नाही लक्ष..!)​

हेही वाचा :  मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही

भावनात्मकदृष्ट्या स्थिर राहा

भावनात्मकदृष्ट्या स्थिर राहा

कोणत्याही नवीन नात्यात येण्यापूर्वी तुमच्या भावना स्थिर होऊ द्या. याचे कारण असे की नवीन नातेसंबंधात उडी घेण्यापूर्वी तुम्ही थोडा वेळ घेतला तर तुम्ही चांगल्या दृष्टीकोनातून नवीन नात्यात प्रवेश करू शकाल. मी तुम्हाला हे करण्यास सांगत आहे कारण जेव्हाही आपण नकारात्मक मार्गाने नवीन नातेसंबंध सुरू करतो तेव्हा त्याचा परिणाम हा कधीच सकारात्मक नसतो. ते एक तडजोडीचे नाते बनते. पण जेव्हा आपण स्वतःमधील आणि आपल्या जोडीदारातील फरक स्वीकारतो तेव्हा नात्यात तडजोड झाल्यासारखे वाटत नाही.

(वाचा :- बायकोशी झालेलं भांडण न संपवता तुम्हीही झोपता? मग आहात भयंकर वाटेवर, या 5 लोकांचे अनुभव ऐकून फुटेल दरदरून घाम)​

स्वत:वर प्रेम करा

स्वत:वर प्रेम करा

तुमचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर, मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या भूतकाळाचा तुमच्या वर्तमान आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नका. याशिवाय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर इतरांना प्रेम देणे देखील तुम्हाला कठीण होईल. म्हणून प्रेम देण्याची आणि प्राप्त करण्याची तुमची क्षमता पुन्हा तयार करा. यामुळे तुमचं नातं तर मजबूत होईलच शिवाय तुम्हाला आतून जाणवत असलेला एकटेपणाही कमी होईल.

हेही वाचा :  दबक्या पावलांनी आला... पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?

(वाचा :- सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप)​

शेवटचा सल्ला

शेवटचा सल्ला

शेवटी सल्ला देताना जाणकार हे सांगतात की मनात कोणतीही कटुता न ठेवता मुलींची पारख करा आणि जर त्यात तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर तिच्या समोर आपला भूतकाळ स्पष्ट सांगा. तिला तुमच्या भावनिक आणि मानसिक अपेक्षा सांगा. जर ती तुमची साथ द्यायला तयार असेल तर साहजिकच तुमचं आयुष्य फुलेल आणि नव्या आयुष्याची तुम्ही सुरुवात कराल. पण मनात कोणतेही गैरसमज ठेवून सगळ्याच मुली वाईट असतात हे धरून चालू नका.

(वाचा :- वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …