Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारीच्या (Nashik Crime) घटनांमुळे स्थानिकांकमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय. या हत्येनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणी संशयित आरोपी भावाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.

कौटुंबिक वादातून लहान भावाने स्वतःच्याच मोठ्या भावाचा खून केल्याचे समोर आले आहे. लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार प्रहार करून ही हत्या केली आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. सदाशिव दामू निकम असे खून झालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. तर हरी दामू निकम (वय 50) असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हरी दामू निकमविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्याकडे चौकशी सुरु केली आहे. 

संशयित आरोपी हरी दामू निकम हा गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मद्यपान करून घरी आला होता. त्यावेळी हरी निकम याने मोठा भाऊ सदाशिव दामू निकम यांना शिवीगाळ करु लागला. यावेळी सदाशिव निकम यांनी हरी निकम याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापाच्या भरात हरी निकमने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हरी निकम याने सदाशिव यांच्या डोक्यातही दांड्याने प्रहार केला. या हल्ल्यात सदाशिव निकम हे जबर जखमी झाले आहे.

हेही वाचा :  दुचाकीच्या धक्क्याने भिकारी कोसळला, खिशातून निघाले साडे तीन लाख रुपये...वाचा काय घडलं

निकम कुटुंबियांनी सदाशिव निकम यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी बायडी कैलास सूर्यवंशी यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी हरी दामू निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

पत्नीच्या हत्येनंतर पतीने केली आत्महत्या

दुसरीकडे पत्नीला जिवंत जाळल्यानंतर आरोपी पतीने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मुंबईच्या धारावी परिसरात घडलाय. दारु पिऊन आल्यानंतर पत्नीसोबत भांडण करताना आरोपी पतीला राग अनावर झाला. यानंतर आरोपी पतीने रॉकेल ओतून पत्नीला जाळून टाकले. आपली चूक कक्षात येताच आरोपीने स्वतःलाही पेटवून घेतलं. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …