माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे. मी माझ्या पत्नीसोबत अरेंज्ड मॅरेज्ड केले होते. लग्नाच्या वेळी मला तिच्याबद्दल एकच गोष्ट माहित होती की ती एक चांगल्या घरची व चारित्र्यवान स्त्री आहे. हिच एक गोष्ट पाहून मी तिची निवड केली होती. जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा मला तिच्यामध्ये ते सर्व गुण आढळले आणि म्हणून मी तिची निवड केली. मी खुश होतो की मला हवी तशी जोडीदार मिळाली आणि माझ्या आई वडिलांना सुद्धा एक संस्कारी सून मिळाली.

पण खरंच आपल्याला वाटतं तसं नसतं. लग्नाच्या नंतर सुरुवातीच्या दिवसांत सगळं काही ठीक होतं. पण नंतर तिचं खरं रूप हळुहळू पुढे येऊ लागलं आणि जे आमच्या समोर आलं ते खरंच खूप धक्कादायक होतं. ती अजिबात आम्हाला वाटत होते तशी नव्हती. ती खूप शिवीगाळ करायची आणि आमच्यासाठी एक मोठा धक्का होता. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

ती खूपच घाण भाषा वापरते

मी स्वत: पुरुष असून कधी एवढी घाण भाषा वापरत नाही, तेवढी घाण भाषा ती एक स्त्री म्हणून वापरते. मला खरंच विश्वास बसत नाही की कोणती स्त्री एवढ्या घाण शिव्या देऊ शकते. ती माझ्या आई वडिलांना सुद्धा खूप वाईट शिव्या देते आणि माझ्यासाठी ही खुप वेदनादायी गोष्ट आहे. माझे बिचारे आई वडील देखील तिला काही बोलू शकत नाही व उत्तर देऊ शकत नाहीत कारण तिला काय बोलावे हेच त्यांना कळत नाही.

हेही वाचा :  Nitesh Rane : 'टिल्ल्या' म्हटल्याने नितेश राणे भडकले; म्हणाले, यांचे काका...

(वाचा :- कोणालाच नाही अशी घाणेरडी सवय नव-याला आहे, त्या एका सवयीने केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळं, ऐकून येईल अंगावर काटा)

इभ्रतीचे वाभाडे काढते

पूर्वी ती फक्त घरात शिवीगाळ करायची, पण हळूहळू तिने आसपास असणाऱ्या शेजाऱ्यांन देखील बॉल लावायला सुरुवात केली आहे. यामुळे इज्जत आम्ही जाते. लोक आमच्या अब्रूचे वाभाडे काढतात. ती सार्वजनिक ठिकाणी सुद्धा शिवीगाळ करायला मागे पुढे पाहत नाही. मला तर ती अगदीच कस्पटासमान वागवते. या सगळ्याच गोष्टीनी मला खूप वेदना होत आहेत. मला मी काय करू हेच काळात नाही आहे. तिच्याशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.

(वाचा :- मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, आकंठ प्रेम असतानाही का पुसलं गेलं नशिबातून बायकोचं नाव)

आता शेवटचा पर्याय उरला आहे

मी तिच्या या सवयीला आणि त्रासाला एवढा कंटाळलो आहे की मला आता एकच पर्याय दिसतो आहे तो म्हणजे तिच्यापासून वेगळे होणे आणि घटस्फोट घेणे. माझ्यासाठी सुद्धा हे एक मोठे पाऊल असेल आणि माझे आयुष्य यामुळे बदलून जाईल. माझे एक मन म्हणते आहे की घटस्फोट घ्यावा तर दुसरे मन म्हणते आहे की अजून एकदा तिला संधी द्यावी. मला काहीच कळत नाही आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

हेही वाचा :  ठाकरे गट बारामतीधून लढणार? 'मातोश्री'वरुने उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश, म्हणाले 'सुप्रिया सुळेंना...'

(वाचा :- माझी कहाणी : मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की….!!)

जाणकारांचे उत्तर

एआईआर इंस्टीट्यूट ऑफ रियलाइजेशन एंड एआईआर सेंटर ऑफ एनलाइटनमेंटचे संस्थापक रवि म्हणतात की, “तुमची स्थिती मी सजू शकतो. मी एवढेच सांगेन की घटस्फोट हा अगदी शेवटचा पर्याय असायला हवा. कारण व्यक्तीची सवय मोडणे हे कठीण असले तरी अशक्य नाही. त्या व्यक्तीला एकदा ठेच लागली किंवा अद्दल घडल तरी तिची सवय बदलून जाते. त्यामुळे तुम्ही 100 टक्के प्रयत्न केल्याशिवाय घटस्फोटाचा निर्णय घेऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे.”

(वाचा :- माझी कहाणी : लग्न करून मी उद्धवस्त झालीये, नव-याची वागणुक अशीच राहिली तर मी लवकरच पागल होईन, कशी सुटका मिळवू?)

तिच्याशी संवाद साधा

ते पुढे सल्ला देताना म्हणतात की, “मला असे वाटते की तुम्ही एकदा तिच्यशी निर्वाणीचे का होईना पण मनातील सगळ्या गोष्टी बोलाव्यात. जोवर तुम्ही तुमची बाजू मांडत नाही आणि जोवत तिची बाजू समजून घेत नाही तीवर ही समस्या संपणार नाही.

हेही वाचा :  माझी कहाणी : नवरा दुसऱ्याच गोष्टीमध्ये व्यस्त असतो, त्या रात्री तर असं काही झालं की ऐकून हादरुन जाल

(वाचा :- माझी कहाणी: गेल्या 5 वर्षापासून मी आई बनू शकली नाही, नव-याला जडलाय विचित्र छंद, कारण ऐकून पायाखालची जमिन सरकेल)

रातोरात काहीही बदलणार नाहीये

तुमचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर मला वाटते की, एका रात्रीत गोष्टी बदलणार नाहीत हे देखील लक्षात ठेवा. . पण जर तुमची पत्नी सुधारण्यासाठी तयार असेल तर तुम्हाला तिच्यात बदल लवकरच दिसून येईल. या वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी तिला मदत करा. सवय मोडायला खूप वेळ जाऊ शकतो. पण समोरच्या व्यक्तीची बदलण्याची तयारी असेल तरच हे परिवर्तन होऊ शकते. पण ती व्यक्ती अडूनच बसली असेल तर मात्र तुम्ही शेवटचा निर्णय घेऊ शकता.”

(वाचा :- Real Stories : माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण..!!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …