Trending Bill Gates Roti : बिल गेट्स यांनी बनवली बिहारी रोटी; मस्त तूप लावून तावसुद्धा मारला, VIDEO पाहून नेटकरी हैराण

Bill Gates Roti Making Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात माइक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाऊंडर बिल गेट्स (Bill Gates) इंडियन स्टाईल रोटी बनवताना दिसत आहेत. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. 

सेलिब्रिटी शेफ शेफ ईटन बर्नथ (Eitan Bernath) यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शेफ , अरबपती  बिल गेट्सला चपात्या बनवण्याचे धडे देताना दिसत आहे. 
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे बिल गेट्सना चपाती बनवताना परिश्रम करावे लागत आहेत. चपाती गोल व्हावी म्हणून बिल गेट्स किती प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा त्यांची चपाती गोल काही होत नाहीये. 

सेलिब्रिटी शेफ बर्नेट भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भारतात खूप मजा केली. बिल गेट्सना भेटल्यानांतर त्यांनी भारत दौर्याविषयी खूप चर्चा केली. कशाप्रकारे त्यांनी भारत नवनवीन दिशेस बनवायला शिकल्या आणि बरच काही . यावर बिल गेट्स यांनी शेफला आपल्याला सुद्धा एक भारतीय डिश शिकवण्याची विनंती केली. यावर शेफने लगेच होकार देत बिल गेट्सना चपाती बनवण्याचे धडे द्यायला सुरवात केली. 

हेही वाचा :  Virat Kohli ने करोडो मुलींमधून बायको म्हणून का केली अनुष्का शर्माचीच निवड?

तर बिल गेट्स यांची पोळी बनवण्याची सुरवात झाली ती कणिक मळण्याच्या प्रक्रियेपासून, शेफने सुरवातीला एका मोठ्या भांड्यात पीठ घेतलं यावेळी हे पीठ बेसनाचं होत कारण शेफने खास बिहार स्पेशल रोटी बनवायला शिकवायला सुरवात केली. चमचाच्या मदतीने हे पीठ मिक्स केलं कणिक मळून रोटी बनवण्याचा उत्तम प्रयत्न केला, पाहता पाहता रोटी बनवून वरून भरपूर तूप घातलं आणि मस्तपैकी तावसुद्धा मारला.  (”Superb” PM Modi Praises bill gates on viral video of making roti viral )

याचंच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटकरी भलतेच खुश झाले आहेत,लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. 

इतकंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर याचा स्क्रिनशॉट शेअर करत ”शानदार , बहुत बढिया रोटी बनायी है ” असं म्हणत कौतुकसुद्धा केलं.

हेही वाचा :  पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …