Virat Kohli ने करोडो मुलींमधून बायको म्हणून का केली अनुष्का शर्माचीच निवड?

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती विराट कोहली (virat Kohli) यांची केमिस्ट्री (Virat and anushka Love story) पाहून अनेक तरुण जोडप्यांना हेवा वाटला असेल. बॉन्डिंग, कमालीची अंडरस्टॅंडिंग आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याची पद्धत विराट आणि अनुष्का यांच्यातील नातं तर बळकट करतेच, पण दोघांचं नातं याचा पुरावा आहे की, जर तुमच्या नात्यात आजही रुसणं-मनवणं सुरू असेल तर तुम्ही एका परफेक्ट नात्यात आहात. शिवाय तुमचा पार्टनर जर तुमचा चांगला मित्र असेल तर लग्नाच्या या नात्याचा आनंद अधिक द्विगुणित होतो यात काही शंकाच नाही. कदाचित हे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना चांगलेच समजले असेल. म्हणूनच इंटरनेटवर सुंदर फोटोज शेअर करण्यापासून ते हातात हात घेऊन दिवसभर एकमेकांसोबत फिरण्यापर्यंत त्यांना फक्त एकमेकांचीच साथ हवी असते.

अर्थातच सामान्य जोडप्यांप्रमाणे अनुष्काही विराटवर कधी-कधी रागावते, पण प्रत्येक वेळी अनुष्काला मनवण्याची विराटची अनोखी पद्धत त्यांच्यातील प्रेम घट्ट करते. पण तुम्ही कधी तुम्ही विचार केला आहे का की, जगभरात विराटचे लाखो-करोडो फॅन्स-फॉलोवर्स असताना त्यातही मुलींची संख्याच जास्त असतानाही विराटने मात्र बायको म्हणून अनुष्का शर्माचीच निवड का बरं केली असावी? नक्की तिच्यामध्ये असं त्याने काय पाहिलं असावं जे त्याने इतका मोठा निर्णय घेतला? जाणून घेऊया त्यांच्या नात्यातील असे काही प्लस पॉइंट्स जे प्रत्येक नात्यात हवेतच..

सपोर्ट सिस्टम

असे म्हटले जाते की मजबूत आणि निरोगी नाते टिकवून ठेवण्यासाठी पती व पत्नीच्या काही खास सवयी असतात ज्यामुळे त्यांचे नाते इतरांपेक्षा चांगले व खास बनते. असाच काहीसा प्रकार विराट आणि अनुष्काच्या नात्यातही आहे, दोघांनीही लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतील याची कधीच पर्वा केली नाही. अनुष्काला हे चांगलंच माहीत होतं की, जेव्हा तिचं नाव विराटसोबत जोडलं जाईल तेव्हा तिला अनेक पॉझिटिव्ह व निगेटिव्ह गोष्टींचा सामना करावा लागले. मात्र त्यानंतरही अनुष्काने विराटला प्रत्येक क्षणी खंबीर साथ दिली. इतकंच काय तर अनेकदा विराट मॅच हरल्यानंतरही लोकांच्या वाईट कमेंट्स यायच्या पण तिने कधीच त्या स्ट्रेसचा नात्यावर परिणाम होऊ दिला नाही. विराटने त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “अनुष्का ही माझी सपोर्ट सिस्टम आहे. जेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यात असतो तेव्हा ती मला उठण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते, तिचा हात देते आणि माझी प्रेरणा बनते.”

हेही वाचा :  काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी मला या गोष्टी माहित असत्या

(वाचा :- माझी कहाणी : वाटलं नव्हतं माझी मैत्रीण धोकेबाज असेल, नव-याचं आयुष्य पार उद्धवस्त करायला निघाली आहे, मी काय करू?)

स्टार इमेज मागे सोडली

ज्यावेळी अनुष्काने विराटशी लग्न केले, त्यावेळी अनुष्का तिच्या करिअरच्या अशा टप्प्यावर होती जिथे असताना बहुतेक अभिनेत्री लग्नाचा विचारही करत नाहीत. लग्न तर दूरच पण अनुष्काने तिची कारकीर्द मागे टाकून विराटचा हात हातात घेण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला. इतकंच नाही तर लवकर लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहे असेही तिने मान्य केले. मात्र, आजच्या काळात प्रेमाची व्याख्याच बदलली आहे. आता जोडपी त्यांच्या करिअरनुसार जोडीदार निवडत आहेत जे अनुष्काने केलं नाही म्हणूनच विराटसाठी ती खास व्यक्ती ठरली.

(वाचा :- माझी कहाणी : सर्व छान असतानाही मला लग्नाची प्रचंड भीती वाटतीये, यासाठी माझेच आई वडिलच आहेत जबाबदार, मी काय करू?)

समजूतदारपणा

विराट कोहलीने आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘सामन्यातील कामगिरीमुळे प्रत्येक गोष्टीचा माझ्या लव्ह लाईफवर परिणाम होत होता. पण अनुष्का इथे हुशारीने व समजूतदारपणे वागली आणि मला आयुष्यातल्या चढ-उतारांना तोंड द्याला तिनेच शिकवले. याचाच अर्थ अनुष्काने हे नाते अतिशय हुशारीने व समजूतदारपणा दाखवून हाताळले आहे. मला शहाणे बनवण्याचे श्रेयही मी तिलाच देईल असंही विराट म्हणाला. बरं, ही झाली विराट-अनुष्काची गोष्ट, पण आपणही प्रेमासोबतच नातं समंजसपणे निभावलं तर येणार्‍या सर्व अडचणी सोप्या वाटू लागतील हेही तितकंच खरं आहे.

हेही वाचा :  प्रियांका चोप्राच्या सास-यांनी सूनेसाठी लिहिलेली ‘ही’ पोस्ट होतीये प्रचंड व्हायरल, विचार वाचून म्हणाल सासरा असावा तर असा..!

(वाचा :- लग्नाआधी पतीविषयी काहीच माहित नव्हतं, त्याची एक घाण सवय जीवघेणी ठरतीये, जवळ जाण्याची इच्छा होत नाही, मी काय करू?)

एकमेकांची बाजू घेणं व साथ देणं

अनुष्काची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती तिच्या पतीला कोणत्याही स्थितीत सपोर्ट करण्यासाठी पुढे पुढे असते. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, अनुष्का तिच्या गरोदरपणासारख्या नाजूक काळातही जेव्हा जेव्हा विराटला तिची सर्वात जास्त गरज असायची तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित असायची. मंडळी, पती-पत्नीचे नाते मजबूत बनवण्याचा पहिली कडी म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना किती प्रमाणात साथ देऊ शकता किंवा एकमेकांची बाजू किती समजून घेता हीच आहे.

(वाचा :- काश…! सासू व सास-यांसमोर ‘ही’ एक गोष्ट करण्याआधी मी काळजी घेतली असती, तर माझ्यासोबत इतकी वाईट घटना घडली नसती..!)

आदर करणं

पती-पत्नीच्या नात्यात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे एकमेकांचा व एकमेकांच्या निर्णयाचा आदर करणं. जर तो जमला नाही तर समोरचा व्यक्ती मनातून उतरायला वेळ लागत नाही. जसं की दोघांमधील एक कोणातरी एखाद्या गोष्टीवरुन नाराज झालं आहे तर दुस-या व्यक्तीने दुर्लक्ष करणं अत्यंत चूक आहे. अशावेळी त्या व्यक्तीचा राग शांत करुन त्याची समजूत घालणं आपलं कर्तव्य असतं. जेणे करुन त्या व्यक्तीला समजेल की आपल्या जोडीदाराला आपल्या भावनांचा आदर आहे. त्याच्या लेखी आपली खूप किंमत आहे.

हेही वाचा :  माझी कहाणी : हनीमूनच्या रात्री ईमेलमध्ये लपवून ठेवलेली एक चिठ्ठी सापडल्याने माझ्या नव-याचं एक खोल रहस्य उघड झालं आणि मग..!

(वाचा :- नवरा भयंकर स्कँडलमध्ये रंगेहात पकडला गेला, 5 जणांची विचित्र कहाणी जिथे पार्टनरला सोडण्यावाचून उरला नाही पर्याय)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …