इस्रायली तरुणीला हमासने निर्वस्त्र करुन फिरवले, आता ‘या’ अवस्थेत मिळाली बॉडी

Israeli Girl kidnapped & Rape: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध संपण्याची चिन्ह दिसत नाहीयत. दिवसेंदिवस या युद्धामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. तसेच यावेळी समाजकंटकांकडून क्रूरतेच्या सीमा पार केल्या जात आहेत. युद्धादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांच्या क्रूर कारवाया समोर येत आहेत. इस्रायलचवरील हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्त्रायली तरुणीचे अपहरण केले होते. तसा एक व्हिडीओ समोर आला होता. यानंतर तिला विवस्त्र करून वाहनात झोपवण्यात आले. पुढे तिच्यासोबत काय झाले?  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

हमासचे दहशतवादी इस्रायली तरुणीला रस्त्यावरुन उचलून घेऊन गेले.  शनी लूक असे या तरुणीचे नाव आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी शनीच्या प्रायव्हेट पार्टसोबत छेडछाड केली. युद्ध सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी शनीला अनेक दिवस आपल्याजवळ ठेवले होते. तसेच ते तिच्यावर जबरदस्ती करत राहिले. तिचा पाशवी शारीरिक छळ केला, अशी माहिती देण्यात आली आहे. आता या शनीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनी लूक या जर्मन-इस्रायली वंशाच्या मुलीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इस्रायलनेही शनीच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. 

हेही वाचा :  Mhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो

’23 वर्षीय जर्मन-इस्रायली शनी लूकचा मृतदेह सापडला असून तिची ओळख पटली आहे. हे कळवताना आम्हाला दुःख होत आहे, असे ट्विटरवरील इस्रायली पोस्टमध्ये म्हटले आहे. 

एका मैफिलीतून शनीचे अपहरण करून हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा छळ केला. हमासच्या दहशतवाद्यांनी शनीला गाझामध्ये फिरवले. यावेळी तिचा छळ करण्यात आला. तिला इजा पोहोचविण्यात आली. या घटनेनंतर आम्ही तिचे कुटुंब आणि मित्र परिवाराच्यासोबत आहोत, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हमासकडून अत्याचार

हमासच्या दहशतवाद्यांनी शनीला विवस्त्र करून तिची परेड काढली. हमासच्या दहशतवाद्यांनी शनीला एका वाहनात नग्नावस्थेत आडवे पाडले. तिच्यावर अनेक दहशतवादीही वेगवेगळ्या मुद्रांमध्ये आडवे झाले पडले. या काळात हमासच्या दहशतवाद्यांनी तिच्यावर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अतिरेक्यांनीही तिला बराच वेळ आपल्याजवळ ठेवले. या काळात तिला भयानक अनुभवातून जावे लागले. आता तिचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …