Women Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत

Special Laws for Women : लग्न करताना अनेक वेळा मुलींसमोर वेगवेगळ्या अटी (conditions) ठेवल्या जातात. लग्न करताना आपल्या सर्वांना काही प्रश्न पडतात. हे प्रश्न कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुमचंही लवकरच लग्न होणार असेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न होणार असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. (Women Empowerment You must know the rights and entitlements before getting married women rights nz)

1. घरगुती हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवा (domestic violence)

कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीवर हात उचलणे योग्य नाही. लग्नानंतर कोणत्याही महिलेसोबत असे घडल्यास ती घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत छळाच्या विरोधात आवाज उठवू शकते.

2. मूलभूत अधिकार (Fundamental Rights)

या सर्व गोष्टींशिवाय, लग्नादरम्यान किंवा नंतर आपले मूलभूत हक्क मिळविण्यात अडचण येत असेल, तर महिलाही आवाज उठवू शकतात. तर हे असे काही हक्क होते जे लग्न करण्यापूर्वी माहित असणे आवश्यक आहे.

3. निवडण्याचा अधिकार (The right to choose)

भारतीय राज्यघटनेतील कलम 21 नुसार “जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण” असे नमूद करते की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकाला निवड करण्याचा मूलभूत अधिकार आहे, त्याचप्रमाणे लग्न करताना मुलीलाही निवड करण्याचा अधिकार आहे. तिला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.

हेही वाचा :  CSMT स्थानकात बनणार आणखी एक हायटेक सबवे, मिळणार वर्ल्ड क्लास सुविधा, प्रवाशांना असा होणार फायदा

4. हुंडा विरुद्ध आवाज उठवा (Raise your voice against dowry)

1961 चा हुंडा बंदी कायदा तुम्हाला अन्याय्य मागण्यांविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार देतो. या कायद्यांतर्गत 2 कलमे आहेत, कलम 3 आणि 4. हुंडा घेणे आणि देणे हे दोन्ही कलम 3 नुसार गुन्हा आहे. त्याचवेळी कलम 4 मध्ये हुंडा मागणाऱ्याला 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते असे म्हटले आहे.

5. मालमत्ता अधिकार (Property rights)

लग्न झाल्यावर सासरच्या घरावरही महिलेचा हक्क असतो. लग्नानंतर पुरुषाच्या जमिनीवर महिलांना 1/3 हिस्सा घेण्याचा अधिकार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …