‘अरे हा काय प्रकार आहे’, अपघातानंतर तुटलेला हात उचलून तरुण रुग्णालयात पोहोचला, हसताना पाहून डॉक्टरही चक्रावले

बिहारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क आपला तुटलेला हात हातात घेऊन रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. तरुण रस्त्यावरुन चालत निघालेला असताना, हे चित्र पाहून लोकांना धक्का बसला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता, ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. तरुण आपलाच तुटलेला दुसरा हात घेऊन पोहोचल्याचं पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता. 

बिहारच्या भागलपूर येथे ही घटना घडली आहे. सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील या घटनेत अपघातानंतर तरुण आपला तुटलेला हात उचलून रस्त्यावर चालत होता. आपला हात पुन्हा जोडला जावा यासाठी तो रुग्णालयाचा शोध घेत होता. विशेष म्हणजे जेव्हा तो रस्त्यावर चालत होता तेव्हा चेहऱ्यावर हास्य होतं. हे पाहिल्यानंतर पादचारी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. 

तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत आपलाच हात घेऊन चालताना पाहून काही लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांनी त्याला जवाहरलाल नेहरु कॉलेज रुग्णालयात दाखल केलं. 

सुमन कुमार असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सगळा घटनाक्रम उघड केला. सुमन कुमार याने पोलिसांना सांगितलं की, ट्रेनमधून प्रवास करत असताना मी खाली पडलो. यावेळी माझा हात कापला गेला. यानंतर हात पुन्हा जोडला जावा यासाठी मी रुग्णालय शोधत होतो. 

हेही वाचा :  मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

“जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुमन कुमार असं या तरुणाचं नाव असून, तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला होता. त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …