cleaning tips: इस्त्री करताना कपडे चिकटतात…कपड्यांवर काळे डाग पडतात…अशी करा झटक्यात साफ

Home cleaning hacks: इस्ञी प्रत्येकाच्या घरात असणारी वस्तू आणि तितकीच महत्वाची सुद्धा मात्र आपल्यापैकी किती जण रोजच्या रोज इस्त्री (rusty iron cleaning hacks) वापरून झाल्यावर स्वच्छ करतो ? जोपर्यंत इस्ञीवर काही डाग पडत नाहीत किंवा इस्ञी खूप गरम होते आणि मग त्याला कापड चिकटवून खराब होत नाही तोवर आपण इस्ञी स्वच्छ करायला घेत नाही.,

आणि मग मात्र स्वच्छ होता होत नाही आणि आपण हैराण होतो पण आता या समस्येवर कायमचा उपाय तुम्ही करू शकता.काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही इस्ञीवरील गंजलेला डाग काढून स्वच्छ लखलखीत इस्ञी मिळवू शकता यासाठी काय करायचंय चला तर मग पाहूया.(home remedies for rusty iron home remedies)

पॅरासिटेमॉल (paracetamol)

ताप आल्यावर घेतली जाणारी पॅरासिटेमॉल ही खूप कामाची आहे . इस्त्रीवर कापड चिकटल्याने जर डाग पडला असेल तर हा रामबाण उपाय तुम्ही नक्क्की करून पाहायलाच हवा .

यासाठी तुम्हाला काय करायचंय तर इस्ञी आधी गरम करून घ्या त्यांनतर बंद करून त्यावर पॅरासिटेमॉल  कडेकडेने घासायला सुरवात करा मग स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या . हीच प्रोसेस दोन तीन वेळा पुन्हा करा आणि काही वेळातच तुम्हाला फरक दिसू लागेल.

हेही वाचा :  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप? शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीत

आणखी वाचा:  kitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा…

बेकिंग सोडा आणि पाणी (baking soda and water mixure)

हा उपायसुद्धा खूप फायदेशीर आहे यासाठी एक चमचा पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा घेऊन पेस्ट बनवून घ्या आता या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील.

चुना आणि मीठ (lime and salt mixture)

इस्ञीवरील गंज(rust ) घालवण्यासाठी चुना आणि मिठाचा वापर तुम्ही करू शकता यासाठी एका भांड्यात मीठ आणि चुना समप्रमाणात घ्या त्याची एक पेस्ट बनवा या पेस्टला इस्त्रीवर लावून ठेवा आणि काही वेळांनंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या . तुम्ही सॅण्डपेपरचा (Sandpaper) सुद्धा वापर करू शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …