पहिल्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ”मला सपोर्ट करण्यासाठी…

Virat Kohli ICC POTM : विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये असून टी20 वर्ल्डकपमध्येतर एकहाती भारताची फलंदाजी सांभाळत आहे. त्याच्या याच कामगिरीसाठी ऑक्टोबरमधील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार (ICC Player Of the Month) त्याला मिळाला आहे. त्याने विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली. ज्यानंतर त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. विराटने दोन्ही खेळाडूंना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. पुरस्कार जिंकल्यानंतर विराटने प्रतिक्रिया देत सहकारी खेळाडूंचे आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.

पुरस्कार जिंकल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे. मला सपोर्ट करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मागील काही महिन्यांमध्ये मला खूप सहकार्य केलं. सर्व फॅन्स आणि टीममधील साथिदारांचे आभार.” विराट कोहलीने प्रथमच आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्याने कोहली फॅन्ससह भारतीय क्रिकेटचाहते कमालीचे आनंदी आहेत.

हेही वाचा :  Who is Neem Karoli Baba : विराट- अनुष्कासाठी ज्यांचे उपदेश प्रमाण, असे नीम करोली बाबा आहेत तरी कोण?

वर्ल्डकपमध्ये कोहलीची ‘विराट’ कामगिरी

विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासून विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. सर्वात पहिला भारताचा सामना पाकिस्तानसोबत झाला. ज्यात एकीकडे भारतीय फलंदाजी ढासळत असताना विराटनं एकहाती झुंज दिली. त्याने सामना जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 62 धावा विराटनं केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट 12 धावाच करु शकला. पण मग बांगलादेशविरुद्ध विराट 44 चेंडूत 62 धावा करुन पुन्हा फॉर्मात परतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने 26 धावा केल्या असून अशारितीने एकूण 5 सामन्यात त्यानं 246 धावा केल्या आहेत.

  

महिलांमध्ये निदा दारनं मारली बाजी

महिला कॅटेगरीमध्ये पाकिस्तानच्या निदा दार (Nida Dar) हिने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला असून दोघींना पछाडत निदाने विजय मिळवला आहे. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स (Jemimah Rodrigues) आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं.  

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …