भावाच्या मृत्यूचा धक्का, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू प्रार्थना साळवेची आत्महत्या  

Prarthana Salve : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमध्ये एका आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटूने (International Basketball Player) धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून 17 वर्षीय प्रार्थना साळवे हिने आत्महत्या केली आहे. प्रार्थनाने आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आत्महत्येपूर्वी प्रार्थनाने कुटुंबीयांना व्हॉईस मेसेज पाठवला होता. ज्यामध्ये तिने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.   

याबाबत मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, बैतुल येथील कालापाठा परिसरात राहणाऱ्या प्रार्थना साळवे हिचा मृतदेह गुरुवारी कोसमी धरणात आढळून आला. या घटनेमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. बुधवारी संध्याकाळी प्रार्थनाने तिच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेज पाठवून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. आत्महत्येमागे तिने भावाचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. प्रार्थनाने मेसेजमध्ये सांगितले की, तिच्या भावाच्या निधनामुळे ती खूप अस्वस्थ आहे.नातलगांना प्रार्थनाचा मेसेज ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तत्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. प्रार्थनाची स्कूटी धरणाच्या काठावर उभी होती. गुरुवारी सकाळी एसडीआरएफच्या टीमने प्रार्थनाचा मृतदेह धरणातून बाहेर काढला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

मागच्या सात महिन्यांपूर्वी इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीत एका प्रियकराने एका मल्टीला आग लावली होती. आ आगीत प्रार्थनाचा भाऊ देवेंद्र साळवे जळून ठार झाला होता. भावाच्या मृत्यूनंतर प्रार्थनाला धक्का बसला होता. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून प्रार्थना सावरू शकली नाही. यातूनच तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याशिवाय प्रार्थनासोबत आणखी एक घटना घडली होती. टूर्नामेंट दरम्यान लिगामेंट फुटल्यामुळे प्रार्थना देखील खूप अस्वस्थ होती. त्यामुळे तिला तिचे भविष्य अंधारात दिसत होते. प्रार्थनाने आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि हा सामनाही भारतीय संघाने जिंकला होता.

हेही वाचा :  Tunisha Sharma ते Sushant Singh Rajput; कलाकारांनी संकटाचा सामना करण्यापेक्षा जीवनयात्रा संपवली

News Reels

प्रार्थनाच्या आत्महत्येमुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रार्थना अभ्यासासोबतच बास्केटबॉल खेळत होती. तिने बास्केटबॉलमध्ये बैतूल जिल्ह्याचे नाव लौकिक मिळवून दिले. प्रार्थनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रार्थनाने आशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि हा सामनाही भारतीय संघाने जिंकला होता. प्रार्थनाच्या अकाली निधनाने खेळाडूंकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Surykumar Yadav Test : सूर्यकुमार यादवसाठी कसोटी संघाची दार उघडणार? या खेळाडूची घेऊ शकतो जागा 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …