केदार जाधवच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता! कौटुंबिक कारण देत रणजीतून माघार घेतली अन् बारामतीत..

Kedar Jadhav : भारतीय फलंदाज केदार जाधव (Kedar Jadhav) सध्या टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात आयपीएलमध्येही (IPL) त्याला कोणत्या संघाने विकत न घेतल्याने तो मैदानातच दिसत नव्हता. पण यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याने काही चांगल्या खेळी केल्या, ज्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. पण आता या सगळ्यामध्येच त्याच्या एका कृतीमुळे तो अडचणीत येईल असं दिसून येत आहे. केदारने कौटुंबिक कारण देत रणजी सामना मध्येच सोडला. ज्यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत बारामतीत एका कार्यक्रमात दिसला. दरम्यान हे असं वागणं शिस्तभंग असल्याचं सांगत त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही मागणी केली आहे.

नेमकं घडलं काय?

रणजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या केदार जाधवने आसाम विरुद्ध अप्रतिम द्विशतक झळकावलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांत त्याने खाजगी कारण देत तो महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना अर्ध्यावरती सोडून बाहेर पडला. ज्यानंतर बारामती येथे तो एका कार्यक्रमात दिसून आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत केदार दिसून आला. दरम्यान एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरु असताना असं खोटं कारण देत त्यातून बाहेर पडणं चुकीचं आहे. याबाबत बीसीसीआयकडे तक्रार करणार असून  कितीही मोठा खेळाडू असला तरी असं वागणं बरोबर नाही. असं करायचं असल्यास क्रिकेट सोडून घरी बसावं, असंही पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा :  कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालं असं काही, पाकिस्तानच्या नावे आणखी एक लाजिरवाणा रेकॉर्ड

केदार जाधवची कमाल फलंदाजी

बराच काळ मैदानापासून दूर असणाऱ्या केदारनं काही दिवसांपूर्वी आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. जाधवची फलंदाजी सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली होती. सामन्यात त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला होता. केदारने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली होती.

news reels New Reels

आयपीएल लिलावात राहिला ‘अनसोल्ड’

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेत सीएसके संघाकडून खेळणारा केदार जाधव सीएसकेपासून (CSK) वेगळा झाल्यानंतर त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलेले नाही. गेल्या दोन हंगामात तो आयपीएल लिलावात अनसोल्डच राहिला.मागील वर्षी 23 डिसेंबर रोजी झालेल्या 2023 च्या आयपीएल लिलावातही (IPL Mini Auction) त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यापूर्वी तो CSK संघाचा भाग होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 नंतर त्याला भारतीय संघातूनही वगळण्यात आले. मात्र आसामविरुद्ध 283 धावांची धडाकेबाज खेळी केदार जाधवने केल्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला होता.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …