Bank Cheque : बँकेच्या चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही करू नका ‘ही’ चूक; आधी नियम समजून घ्या

Bank Cheque Rules : बँकेचे बरेचसे व्यवहार आता Digital स्वरुपात होत असले तरीही काही व्यवहारांसाठी मात्र तुम्ही बँकेत प्रत्यक्ष हजर राहणं अपेक्षित असतं. अशा या बँकेच्या लहानमोठ्या व्यवहारांविषयी, सातत्यानं बदलणाऱ्या नियमांविषयी तुम्हाला कल्पना असणं अपेक्षित आहे. त्यामुळं ही माहिती लक्षपूर्वक वाचा. 

तुम्ही सहसा बँकेच्या चेकवर लाख हा शब्द इंग्रजीत कसा लिहिला? Lakh की Lac? लाखचा उच्चार करतना त्याची योग्य स्पेलिंग काय याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? याबाबत प्रत्येकाची वेगळी मतं. पण, तुम्हाला आरबीआयचा नियम माहितीये? 

बऱ्याचदा चेकच्या माध्यमातून मोठ्या रकमेची देवाणघेवाण होते. थोडक्यात मोठे व्यवहार पार पडतात. अशा वेळी चेक रद्द होण्याचीची शक्यता असते. त्यामुळं चेक भरतेवेळी तो व्यवस्थित भरणंही तितकंच महत्त्वाचं. 

नियम काय सांगतो? 

चेक कसा भरावा यासाठीसुद्धा रिझर्व्ह बँकेकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. पण, यात काही अपवादही आहेत. इथं ‘लाख’ हा शब्द कसा लिहावा हे बँकेकडून सांगण्यात आलेलं नाही. पण, आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र Lakh असंच लिहिण्यात आलं आहे. ज्यामुळं सर्व बँकांनी खातेधारकांना त्यासंबंधीचे निर्देश दिले असून, चेकवर Lakh लिहिणं बंधनकारक असेल असं सांगितलं आहे. प्रमाण भाषेसाठी Lakh हाच शब्द ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळं इथून पुढं चेकवर Lac असं चुकूनही लिहू नका. असं केल्यास तुमचा चेक बाऊन्स होऊ शकतो. 

हेही वाचा :  बँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा

Lakh आणि Lac चा अर्थ समजून घ्या  

Lakh आणि Lac या दोन्ही शब्दांचा अर्थही वेगळा होतो. इंग्रजी डिक्शनरीनुसार Lakh या शब्दाचा वापर अंक दर्शवण्यासाठी होतो. तर, Lac शब्दाचा अर्थ किड्यातून निघणारा एक चिकट द्रव असा होतो. त्यामुळं हे वेगळे अर्थ पाहता दोन्ही शब्दांचा होणारा वापरही तितकाच योग्य असणं अपेक्षित आहे. 

चेक भरताना कायम लक्षात ठेवा की… 

चेक भरत असताना तिथं भरण्यात येणारी रक्कम दोनदा लिहावी लागते. जिथं रक्कम आकड्यात आणि अक्षरातही भरावी लागते. तुम्ही Lakh, Lac लिहिताना गोंधळ घातला तरीही रकमेचा आकडा लिहिताना मात्र अजिबातच गोंधळ घालू नका. अन्यथा तुमचा चेक रद्द केला जाऊ शकतो. पुढे व्यवहारांमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळं चेक भरताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …