Traffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Traffic Police Video : सोशल मीडियावर अनेक थरकाप आणि धक्कादायक व्हिडीओ आपली झोप उडवतात. त्यातील काही व्हिडीओ हे अपघाताचे असतात तर गुन्हेगारी जगतातील असतात. शनिवारी रात्री माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश (UP Crime News) पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News) 

तरदुसरीकडे कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता त्या तिघांनी केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहनचालकांनी नियमाचं उल्लंघन केलं आणि वाहतूक पोलिसांपासून वाचण्यासाठी कारचालकाने जे कृत्य केलं ते सीसीटीव्हीत (#CCTV) कैद झालं आहे. मुंबईसह दोन शहरात या घटनेचे थरकाप उडणारे व्हिडीओ समोर आले आहेत.

अरेरे, खतरनाक!

पहिली घटना मुंबईतील नवी मुंबईमधील आहे. अंमली पदार्थ आणि स्फोटके असल्याच्या संशयावरुन या वाहतूक पोलिसानं कारला थांबविण्याचा प्रयत्न  केला. पण कारचालकाने गाडी न थांबता गाडी पोलिसाच्या अंगावर घातली. कारला थांबविण्यासाठी जाब पोलिसाने त्या बोनेटला धरुन ठेवलं तरी चालक थांबला नाही. 

हेही वाचा :  शेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ

या कारचालकाने भर दिवसा पोलिसाला कारच्या बोनेटवरुन 10 ते 12 किलोमीटर फरफटत नेले. नवी मुंबईतच्या पाम बीच रोडवर हा सगळा थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी या कारचालकाचा पाठलाग केल्यानंतर वाहतूक पोलिसाची सुटका झाली. हा व्हिडीओ ट्वीटरवर @Satish_Daud या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

काळजाचा ठोका चुकवणाऱ्या व्हिडीओ 

दुसरा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पंजाबच्या लुधियानामधील. इथेही एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला उडवत बोनेटवरुन फरफटत नेलं. हरदिप सिंघ असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @NikhilCh_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

थरकाप उडविणारा व्हिडीओ

तर तिसरी घटना ही पंजाबमधीलच असल्याचं बोलं जातं आहे. काळजाचा ठोको चुकवणाऱ्या या व्हिडीओमध्ये कार चालकाला थांबविण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर चढला. कार चालकाने गाडीला ब्रेक न लावता त्या पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं. हे दृश्यं पाहून नागरिक कारच्या मागे धावले. मग त्या ड्रायव्हरने काही अंतरावर जाऊन गाडी थांबली आणि पोलिसाचा जीव वाचला. 

पोलिसांनी कार चालकाला गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तो खूप घाबरलेला दिसत होता. हा व्हिडीओ ट्वीटरवर @Arhantt_pvt या अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. 

हेही वाचा :  VIDEO: संतापजनक! मॉलमध्ये वृद्ध व्यक्तीचा तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …