ICC Player of the month पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) दरमहिन्याला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the motnh) हा पुरस्कार देण्यात येतो. महिन्याभरात विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार कामिगिरी करणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या या पुरस्कारासाठी यंदाही तीन खेळाडूंनाै नॉमिनेट करण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकाचा विजेता संघ इंग्लंडचे (England) दोन खेळाडू तर उपविजेत्या पाकिस्तानच्या एका खेळाडूला नॉमिनेट केलं गेलं आहे. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) फिरकीपटू आदिल रशिद (Adil Rashid) आणि पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांचा समावेश आहे.

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. इंग्लंडच्या या विजयाचे हिरो कर्णधार जोस बटलर आणि आदिल रशीद तसंच बेन स्टोक्ससारखे खेळाडू होते. यामुळे जोस बटलर आणि आदिल रशीद हे यंदाच्या ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 2022 चा टी20 विश्वचषक चांगलाच गाजवला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शाहीनला दुखापत झाल्याने पूर्ण षटके टाकता आली नाहीत. तरी तो देखील पुरस्काराचा तगडा दावेदार नक्कीच आहे.


News Reels

हेही वाचा :  कांगारुचे हेजलवुड-स्टार्क तर टीम इंडियाचे बुमराह-पंत संघाबाहेर; जाणून घ्या कोणता संघ मजबूत

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड

आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानची सिद्रा अमीन, थायलंडची नथकन चंथम आणि आयर्लंडची गॅबी ल्यूईस यांना नामांकित करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …