लग्न टिकविण्यासाठी करा ही तडजोड, नातं टिकेल अधिक काळ

अभिनेत्री क्षिती जोग आणि हेमंत ढोमेने आपल्या सुखी संसाराचा फोटो शेअर करत लग्नाला १० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. अनेकांना नक्कीच हा प्रश्न पडतो की, लग्न झाल्यानंतर ते निभावणं कठीण होतंय. मग अशावेळी नक्की कसं वागायचं हेच कळत नाही. लग्नानंतर भांड्याला भांडं लागतंच यात काहीच नवीन नाही. पण त्याचा विस्फोट होऊ न देता, एकमेकांना समजून घेत अधिक काळ कसं एकत्र राहता येईल याबाबत अनेकांना सल्ला हवा असतो. कारण सध्या घटस्फोटाचं प्रमाणही वाढताना दिसून येत आहे. लग्नानंतर काही सवयी आपल्याला लाऊन घेतल्या अथवा काही बदल केले तर लग्न टिकवणं आणि नातं टिकवणं सहज शक्य होते.

एकमेकांवर विचार न थोपणे

तुमचे लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज. नात्यामध्ये प्रेम, आपलेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि लग्नाचे नाते अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वात पहिले सिक्रेट म्हणजे एकमेकांचे विचार हे थोपण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण असे केल्याने प्रेमापोटी अनेकदा आपला जोडीदार ऐकतो पण असं अनेक वेळा झालं तर मग नात्यात आदर करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे नात्यात कडवटपणा निर्माण होण्यास सुरूवात होते.

हेही वाचा :  '...नाहीतर मरायला तयार राहा'; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम

सर्वस्वी अवलंबून न राहणे

तुम्ही तुमच्या जोडीदारावर अत्यंत प्रेम करताय याबाबत काहीच चूक नाही. पण त्या प्रेमापोटी आपल्या जोडीदारालाच तुम्ही आपलं जग बनवून घेत असाल तर तुम्ही नक्कीच स्वतःला दुखावत आहात. कारण असं केल्यामुळे वाद अधिक वाढतात. तुमच्या अपेक्षा समोरचा जोडीदार प्रत्येकवेळी पूर्ण करू शकत नाही आणि मग मनात अधिकाधिक राग आणि निराशा निर्माण व्हायला लागते. वेळीच न बोलल्यामुळे याचे रूपांतर वादात होते आणि मग नात्यात दुरावा निर्माण होतो.

(वाचा – या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न)

इतरांशी तुलना करणे

आपल्या जोडीदाराची इतरांशी केलेली तुलना हेदेखील नातं न टिकण्याचं कारण आहे. त्यामुळे कधीही अशी तुलना करू नका. आपल्या एक्स बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंडचे नाव घेऊन तर तुलना अजिबातच करू नका. यामुळे आपला जोडीदार अधिक दुखावला जातो. अगदी मस्करीतही असे करणे चुकीचेच आहे. त्यामुळे लग्न टिकवायचे असेल तर ही चूक कधीच करू नका.

(वाचा – Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श)

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितल्या Weight Loss मध्ये होणाऱ्या हमखास ३ चुका, यामुळे इंचभरही हटणार नाही चरबी

जोडीदाराला गृहीत धरणे

जोडीदाराला सतत गृहीत धरणे लग्नाच्या नात्यात कडवटणा आणते. सतत एकाच व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करत राहणे हे एका पातळीपर्यंत व्यक्ती सहन करू शकते. त्यानंतर नात्यात दुरावा निर्माण होऊन वादाची ठिणगी पडते आणि मग मनात तेच तेच विचार करून सतत भांडण होऊ लागते. याचे रूपांतर एकाच घरात राहून सतत भांडणं होणे यामध्ये होते आणि मग घटस्फोटापर्यंत पाळी येते. त्यामुळे जर तुमचा जोडीदार तुम्हाला याबाबत सतत सांगत असेल तर गृहीत धरले जाणार नाही याची काळजी घ्या. लग्न टिकविण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.

(वाचा – रितेशला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची जिनिलिया, अशी आहे ‘वेड’ लावणारी लव्हस्टोरी)

वेळ देणे

जेव्हा जेव्हा जोडीदाराला आपली गरज आहे तेव्हा तेव्हा वेळ काढून आपलं अजूनही तितकंच प्रेम आहे हे नक्कीच सांगावं लागतं. एखाद्याचा बोलण्याचा स्वभाव नसला तरीही आपल्या कृतीतून ते दाखवून द्यावं लागतं. नातं टिकविण्यासाठी ही अत्यंत संवेदनशील आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून आपल्या जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून द्या.

लग्न टिकविण्यासाठी आणि निभावण्यासाठी दोन्ही जोडीदारांना तडजोड, प्रयत्न आणि संवादाची नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळेच लग्न निभावणे सोपे जाते. या टिप्समुळे तुमच्या लग्नातील ताणतणाव दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

(फोटो क्रेडिटः Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …