इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये ऋषभ पंत असू शकतो संघात, कोच राहुल द्रविड म्हणाला…

Rishabh Pant : झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) शेवटच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. त्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागले होते. पण योग्यवेळी फलंदाजीची संधी मिळूनही ऋषभ पंत अगदी स्वस्तात 3 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या अर्थात सेमीफायनलच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन पंतवर विश्वास ठेवून त्याला संघाक घेणार का असा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यातच कोच राहुल द्रविडच्या एका वक्तव्यानं पंत कदाचित संघात असू शकतो असं म्हटलं जात आहे.

राहुल द्रविड पंतच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, ‘केवळ एका सामन्याच्या आधारे खेळाडूचा खेळ ठरवणं योग्य नाही, पंतवरील संघ व्यवस्थापनाचा विश्वास कधीच कमी झाला नाही. आमच्यासोबत 15 खेळाडू आहेत, सगळेच आत्मविश्वासाने भरलेले आहेत, पण केवळ 11 खेळाडूंनाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्यात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, हे टीम मॅनेजमेंट आणि रणनीतीवर अवलंबून आहे. पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, ऋषभ पंत नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. त्याचा टायमिंग चांगला आहे. याशिवाय तो विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणाचा सरावही करत आहे.’ या सर्व वक्तव्यामुळेच कदाचित पंतला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  टॉम लेथमची तुफान फटकेबाजी, जोडीला केनची दमदार बॅटिंग, न्यूझीलंडचा 7 गडी राखून दमदार विजय

सेमीफायनल वेळापत्रक कसं?

सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापू्वी अर्धातास नाणेफेक होईल.

भारत-पाकिस्तान येऊ शकतात फायनलमध्ये आमने-सामने?

तर ग्रुप 2 मधून भारत आणि पााकिस्तान हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये गेले आहेत. भारतानं 5 पैकी 4 सामने जिंकून एकूण 8 गुणांसह दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झाल्याने पाकिस्तान बांग्लादेशला मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारत इंग्लंडसोबत आणि पाकिस्तान न्यूझीलंडसोबत सेमीफायनल खेळेल आणि दोघे संघ आपआपले सामने जिंकून फायनलमध्ये आमने-सामने येऊ शकतात.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …