majhinews

युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॅट्यू, पाहा फोटो

सध्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत …

Read More »

UP Election: “अमित शाहांचा मुलगा दुबईत कोटींची कमाई करणार आणि उत्तर प्रदेशचा तरुण ‘शेण’ विकणार”

उत्तर प्रदेशचे तरुण पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला शेण विकण्याच्या लायकीचे समजतात. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शेणापासून उत्पन्न’ या विधानावरुन गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह दुबईच्या शेखसोबत कोटींची कमाई करणार आणि उत्तर प्रदेशचे तरुण ‘शेण’ विकणार, असं …

Read More »

सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल

सतत लघवी होणे ही अशी एक समस्या आहे जिच्याकडे बहुतेक महिला दुर्लक्ष करतात. तुम्हाला माहित आहे का, जास्त लघवी होणे हे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे कारण असू शकते. हे इन्फेक्शन मूत्र प्रणालीच्या कोणत्याही भागात होऊ शकणारे इन्फेक्शन आहे. जेव्हा मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात बॅक्टेरिया जमा होतात तेव्हा त्या भागात सूज आणि जळजळ होते. या जीवाणूंमुळे मूत्रमार्गात सूज निर्माण होते, ज्यामुळे लघवी करताना जळजळ …

Read More »

राजधानी दिल्लीत उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट; केजरीवाल सरकारचा ‘हा’ विशेष कार्यक्रम

हा कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला जाणार होता, परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित म्युझिकल शो २५ फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. १५ दिवस हा कार्यक्रम दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये ४० फूट रिव्हॉल्व्हिंग प्लॅटफॉर्म, डझनभर एलईडी स्क्रीन, डिजिटल प्रॉप्स, १६० नर्तक आणि अनेक कलाकार सादरीकरण करणार …

Read More »

अजित पवारांचे आभार मानणाऱ्या भाजपा नगरसेवकाचा राजीनामा; स्थानिक आमदाराला कंटाळून घेतला निर्णय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपाला गळती लागली असून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधनाला दिसत आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये आता स्थानिक आमदाराच्या हुकूमशाहीला कंटाळून भाजपाच्या तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, तुषार कामठे हे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते. त्यामुळे आता तुषार कामठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी चर्चा …

Read More »

रशिया दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शशी थरुर यांनी सुनावलं; करुन दिली वाजपेयींची आठवण

इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर…: शशी थरुर यांचे खडे बोल रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने एकीकडे जगभरातून निषेध केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इम्रान खान दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून २३ तारखेला ते मॉस्कोत दाखल झाले. एकीकडे पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली असताना दुसरीकडे इम्रान खान यांचा दौरा असल्याने …

Read More »

Shukra Grah Gochar: २७ फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं मकर राशीच गोचर, ‘या’ राशींच्या अडचणी वाढणार

वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. ज्योतिषांच्या मते, जर कुंडलीत शुक्र ग्रह शुभ स्थितीत नसेल तर व्यक्तीच्या जीवनातील शुभ कार्य तितकी होत नाही. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह शुभ आणि चांगल्या स्थितीत असतो, अशा लोकांचा स्वभाव आकर्षक असतो आणि स्वभावाने खूप रोमँटिक असतात. याशिवाय …

Read More »

India vs Sri Lanka: वेस्ट इंडीजनंतर आता श्रीलंका मोहीम..! जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

आज उभय संघात पहिला टी-२० सामना खेळवला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत जबरदस्त यश मिळवले. आता भारतीय संघाच्या नजरा श्रीलंकेविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर आहेत. भारत-श्रीलंका तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांसाठी भिडणार आहेत. आज २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळेल. विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० मालिकेचा भाग …

Read More »

नवाब मलिकांना आणखी एक धक्का; ईडीकडून कप्तान मलिक यांना समन्स जारी

मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली आहे.  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. त्यानंतर आता नवाब मलिक यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स …

Read More »

‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचे लाखो चाहते आहेत. सैफ लवकरच अभिनेता हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ आणि हृतिक मोठया पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, विक्रम म्हणजेच सैफचा फस्ट लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला …

Read More »

“आता १० रुपयांच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल”, जितेंद्र आव्हाडांचा ईडीवर निशाणा; म्हणाले, “जेव्हा नितीन गडकरींवर…!”

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नितीन गडकरींबद्दल घडलेला ‘तो’ प्रसंग सांगितला आहे. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून मात्र ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान …

Read More »

पुण्यात ‘पाठक बाईं’ची पर्स चोरीला; गाडीच्या डिकीतून चोरट्यांनी केली लंपास

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरा घरात पोहोचलेल्या पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेमुळे अक्षया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता अक्षया सोबत पुण्यात एक घटना घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली असता तिच्या दुचाकीच्या डिकीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्या पर्समध्ये ५ ते ६ हजार रुपये होते. या घटनेनंतर अक्षयाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला आणि घटलेली घटना सांगितला. …

Read More »

विश्लेषण : रशियापासून ‘स्फूर्ती’ घेऊन कोणते देश बनू शकतात आक्रमक?

रशियाने युक्रेनच्या सार्वभौम सीमेअंतर्गत हल्ले सुरू केल्याचे जाहीर केल्यामुळे किती दिवस सुरू असलेली याविषयीची अनिश्चितता संपुष्टात आलेली आहे. रशियाने यापूर्वी म्हणजे २०१४मध्येही युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर कब्जा करताना तेथील बंडखोरांना हाताशी घेतले होते. आताही डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनच्या प्रांतांमधील बंडखोरांच्या मदतीला जात असल्याचे दाखवत रशियाने थेट युक्रेनची राजधानी किएव्हलाही लक्ष्य केलेले दिसून येते. रशियाच्या या आक्रमणाला थोपवण्याची कुवत सध्या तरी …

Read More »

Petrol- Diesel Price Today: युक्रेन-रशिया तणावामुळे महागलं पेट्रोल आणि डिझेल; जाणून घ्या आजचा दर

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या …

Read More »

नवाब मलिकांवरील कारवाईवरुन महाविकास आघाडी आक्रमक; मंत्रालयाजवळ आंदोलनाला सुरूवात

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी …

Read More »

युक्रेनबाबत अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा; इम्रान खान घेणार व्लादिमीर पुतिन यांची भेट

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मॉस्को भेटीवर प्रतिक्रिया दाताना अमेरिकेने युक्रेनमधील रशियाच्या कृतीवर आक्षेप घेणे प्रत्येक जबाबदार देशाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनमधील परिस्थितीबाबत अमेरिकेने पाकिस्तानला आपली भूमिका कळवली आहे. “रशियाने युक्रेनवर नव्याने केलेल्या आक्रमणाबाबत आम्ही पाकिस्तानला आमची भूमिका कळवली आहे. आम्ही त्यांना युद्धाबाबत मुत्सद्देगिरीच्या आमच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे,” …

Read More »

मधे पडाल तर वाईट परिणाम भोगावे लागतील! अमेरिकेसह युरोपला पुतीन यांचा धमकीवजा इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रशियन सैन्य युक्रेनमध्ये कधीही घुसू शकते. त्याच वेळी, पुतिन यांनी युक्रेनमधील रशियन कारवायांमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना त्यांच्या सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. सुरक्षा …

Read More »

BLOG: उद्धवदादा, पुरे झालं! आता तरी ऐका आमची व्यथा…

प्रिय उद्धवदादा, दादाच! आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यापेक्षाही अधिक आमच्या कुटुंबाचे प्रमुख, मोठा भाऊ, वडील, घरचा कर्ता मुलगा…याच नात्याने तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. राज्यासह देश, जग करोनाच्या महाकठीण संकटात सापडलं होतं. प्रत्येक जण घाबरला होता. आपण आज मरतोय की उद्या…अशा भीतीत प्रत्येकजण जगत होता. पण या भीतीच्या वातावरणात तुमचं आमच्याशी संवाद साधणं, वेळोवेळी धीर देणं, आपल्य़ा शांत, संयमी वाणीने आमच्या …

Read More »

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर… आधी दाऊदच्या भावाला अटक…दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक …

Read More »

कोल्हापूर : महावितरणाचं कार्यालय शेतकरी संघटनेनं पेटवलं; सरकारला इशारा देत म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष…”

आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले. कार्यकारी …

Read More »