राजधानी दिल्लीत उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट; केजरीवाल सरकारचा ‘हा’ विशेष कार्यक्रम


हा कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला जाणार होता, परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित म्युझिकल शो २५ फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. १५ दिवस हा कार्यक्रम दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये ४० फूट रिव्हॉल्व्हिंग प्लॅटफॉर्म, डझनभर एलईडी स्क्रीन, डिजिटल प्रॉप्स, १६० नर्तक आणि अनेक कलाकार सादरीकरण करणार आहेत.

आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांनी मंगळवारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात ‘बाबासाहेब: द ग्रँड म्युझिकल’ २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून १२ मार्चपर्यंत चालणार आहे. या दरम्यान दररोज दोन शो होतील. कलाकार महुआ चौहान दिग्दर्शित १२० मिनिटांच्या या नाटकात बॉलीवूड अभिनेता रोहित रॉय डॉ.आंबेडकरांची मुख्य भूमिका साकारणार आहे.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम गेल्या वर्षी आयोजित केला जाणार होता, परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.चौहान म्हणाले, “आम्हाला ते इतर चरित्रात्मक चित्रपटांसारखे करायचे नव्हते. या चित्रपटाचा प्रत्येक भाग तरुणांसाठी संदेश देणारा आहे. आंबेडकर हे केवळ संविधानाचे जनकच नव्हते तर महिला सक्षमीकरणासाठी आणि युवा नेत्यांसाठी ते कसे लढले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. आम्ही मुलांना ते पाहण्यासाठी आणि समाजसुधारकाच्या जीवनातून काहीतरी शिकण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”

हेही वाचा :  आता ३ वर्षांपूर्वीच कळणार हृदयविकाराचा धोका; शास्त्रज्ञांनी शोधून काढले नवे तंत्रज्ञान

दिल्ली सरकार या म्युझिकल शोचे आयोजन करत आहे. १०० फूट उंचीचा हा सर्वात मोठा शो असेल. आप आमदार आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “हॉलची क्षमता २,००० लोकांची आहे पण आम्ही ५० टक्के आसन क्षमतेवर काम करत आहोत. आम्ही कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. प्रत्येक कोपऱ्यावर हँड सॅनिटायझिंग स्टेशन असतील आणि लोकांसाठी फेस मास्क अनिवार्य असेल. आम्हाला आनंद आहे की पहिले दोन शो पूर्णपणे बुक झाले आहेत.”

या कार्यक्रमाबाबत आतिशी यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी १०० फूट मोठा आणि ४० फूट फिरणारा स्टेज तयार करण्यात आला आहे. हा जगातील सर्वात मोठा स्टेज शो असेल. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सरकारने हा शो तयार केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …