majhinews

“सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात…”; दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे-पाटलांवर हल्लाबोल

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरु असतानाच दिशाच्या आई वडिलांनी बुधवारी राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी आपल्या मुलीची बदनामी राजकारण्यांनी थांबवावी अशी मागणी केली. दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यात भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष …

Read More »

विश्लेषण : मणिपूरमध्ये राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना

ईशान्येकडील राज्यामध्ये एखादी मोठी घटना घडल्याखेरीज राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांचे लक्ष त्या राज्यांकडे जात नाही अशी तक्रार तेथील नागरिकांची असते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. आताही पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण माध्यमांमध्ये मणिपूरला फारसे स्थान मिळालेले नाही. मणिपूरमध्ये ६० जागांसाठी २८ फेब्रुवारी तसेच ५ मार्चला मतदान होत आहे. प्रमुख लढत राष्ट्रीय …

Read More »

नवाब मलिक यांना अटक ; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली़ दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात …

Read More »

ED Arrests Nawab Malik : फडणवीसांवर केलेले आरोप मलिकांना भोवले

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता यांना वादात ओढण्याचा केलेला प्रयत्न मलिकांना त्रासदायक ठरला आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक झाली होती. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला झालेल्या अटकेनंतर मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. या …

Read More »

महाविकास आघाडी संघर्षांच्या पवित्र्यात ; नवाब मलिक यांना अभय, आज मंत्र्यांचे धरणे

मुंबई :  अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केला. अटक झाली तरी मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. तसेच  गुरुवारी महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने …

Read More »

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक तुरुंगात

मुंबई: छगन भुजबळ, अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक या पहिल्या फळीतील नेतेमंडळींच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विविध नेत्यांवर होणारे आरोप किंवा नेतेमंडळींच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्याचे परिणामही राष्ट्रवादीला भोगावे लागले आहेत. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. खंडणीच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुंरुगात आहेत. या यादीत …

Read More »

सर्वानाच लोकल प्रवासासाठी रेल्वेची सज्जता ; राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा

मुंबई : सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. यात सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता अससल्याने मध्य व पश्चिम रेल्वेही सज्ज राहिली आहे. यात सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्याबरोबरच  एटीव्हीएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर १७८ एटीव्हीएम सुरू करण्यात आली असून रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवा दिली जात …

Read More »

चालू आर्थिक वर्षांत विकासदर ८.६ टक्क्यांवर सीमित राहील – इंडिया रेटिंग्ज

भारताचा आर्थिक विकासदर हा चालू वर्षांत आधी अंदाजलेल्या ९.२ टक्क्यांवरून ८.६ टक्के असा राहू शकेल. मुंबई : भारताचा आर्थिक विकासदर हा चालू वर्षांत आधी अंदाजलेल्या ९.२ टक्क्यांवरून ८.६ टक्के असा राहू शकेल. खालावलेला सुधारित अंदाज ताज्या टिपणांतून इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने बुधवारी व्यक्त केला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ७ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अनुमानानुसार, चालू आर्थिक वर्षांसाठी देशाचा …

Read More »

‘क्रिप्टो’ जाहिरातबाजीवर अंकुश

जोखीमविषयक ठळक ‘अस्वीकृती’ बंधनकारक मुंबई : क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या भ्रामक दाव्यांच्या जाहिरातींना चाप बसणार आहे. जाहिरात क्षेत्राची नियामक संस्था अ‍ॅडव्हर्टायिझग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आस्की) फर्मानानुसार, येत्या १ एप्रिलपासून आभासी चलन आणि ‘नॉन फंजिबल टोकन’ अर्थात ‘एनएफटी’च्या जाहिरातींसह ‘कायदेशीर मान्यता नसलेली आणि उच्च जोखीम असलेली गुंतवणूक’ असा सुस्पष्ट उल्लेख असलेल्या अस्वीकृती नमूद करणे जाहिरातदारांना बंधनकारक ठरेल.   …

Read More »

मंदीवाल्यांची पकड अधिक घट्ट

प्रमुख निर्देशांकांत सलग सहाव्या सत्रात घसरण मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होण्याचा धोका अजूनही कायम असल्याने बुधवारी सलग सहाव्या सत्रात भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतल्याने गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्सने १,०७८ अंश गमावले आहेत. बुधवारच्या सत्रात बराच काळ दोन्ही प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. मात्र विशेषत: अखेरच्या तासात निर्देशांकात घसरण वाढत गेली. दिवसअखेर मुंबई शेअर …

Read More »

‘भारतपे’मधून सहसंस्थापक ग्रोव्हर यांच्या पत्नीची हकालपट्टी

पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’ने त्यांचे अडचणीत सापडलेले सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांचीही कंपनीतून बुधवारी हकालपट्टी केली. त्या ऑक्टोबर २०१८ पासून त्या कंपनीच्या आर्थिक नियंत्रणे विभागाच्या प्रभारी होत्या. माधुरी जैन-ग्रोव्हर यांनी बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी आणि परदेशातील सहलींसाठीची अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, कंपनीने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. …

Read More »

आर्थिक विवंचनेतही भरीव निधी ; ‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी १७ हजार कोटींची तरतूद

जयेश सामंत-नीलेश पानमंद, लोकसत्ता ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकास कामांवर मात्र यंदाही भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मेट्रो तसेच इतर विकास प्रकल्पांसाठी येत्या आर्थिक वर्षांत १७ हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात यात विविध मेट्रो प्रकल्पांकरिता ६६०४ कोटी ६१ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली …

Read More »

२० वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण!

मुकेश अंबानी यांचे मत पुणे : हवामान बदल हे सर्वात मोठे संकट असल्याने आता हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर अपरिहार्य आहे. पुढील वीस वर्षांत भारत हरित आणि स्वच्छ ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्यास ५०० अब्ज डॉलर्सची निर्यात करून जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असे मत रिलायन्स उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी बुधवारी मांडले. सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) भारत …

Read More »

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण स्पष्ट नाही

अग्निरोधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा; चौकशी अहवालातील निष्कर्ष मुंबई :  ग्रॅन्टरोड येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल एक महिन्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला असून आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अज्ञात असल्याचे यात म्हटले आहे. अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबाबत इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही या अहवालात प्रस्तावित …

Read More »

कारवाईच्या निषेधार्थ पुणे, पिंपरीत आंदोलन

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे. February 24, 2022 12:02:26 am अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे. …

Read More »

“…तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही तुडवू”, राजू शेट्टींकडून कोल्हापुरात नितीन राऊतांचा पुतळा जाळत इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे. तसेच जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे बंद करा, असंही मत व्यक्त केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीला सलग १० तास दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

PKL 2022 Semifinal : पवन सेहरावतच्या बंगळुरू बुल्सची एक्झिट; दिल्ली फायनलमध्ये!

सेमीफायनलमध्ये दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात दिली. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीने फायनलमध्ये प्रवेश नोंदवला आहे. रंगतदार झालेल्या सेमीफायनलमध्ये दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात देत आपणच दबंग असल्याचे सांगितले. स्पर्धेत तुफान फॉर्मात खेळणाऱ्या पवन सेहरावतच्या बंगळुरू संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीला पाटणा पायरेट्सशी भिडावे लागणार आहे. २५ फेब्रुवारीला हा सामना …

Read More »

विश्लेषण : नवाब मलिक ठरले होते यापूर्वीही वादग्रस्त; तरीही राष्ट्रवादीसाठी का महत्त्वाचे?

नवाब मलिक यांना यापूर्वीही गैरव्यवहाराच्या ठपक्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या मंत्रिपदाच्या दोन्ही कारकिर्दी वादगस्त ठरल्या. संतोष प्रधान जमिनीच्या व्यवहारावरून राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. मलिक यांना यापूर्वीही गैरव्यवहाराच्या ठपक्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या मंत्रिपदाच्या दोन्ही कारकिर्दी वादगस्त ठरल्या. तरीही प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे आणि …

Read More »

PKL 2022 Semifinal : पाटणा पायरेट्सची फायनलमध्ये धडक!

सेमीफायनलमध्ये पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला. यासह पाटणा पायरेट्सने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यूपी योद्धाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पूर्वार्धानंतर पाटणा पायरेट्सने २३-९ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाच्या रेडर्स आणि बचावपटूंना चालू दिले नाही. या कारणास्तव, …

Read More »

“गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से”, नवाब मलिकांच्या अटकेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकरच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अटकेचा निषेध नोंदवला. ‘गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे …

Read More »