कारवाईच्या निषेधार्थ पुणे, पिंपरीत आंदोलन

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत खोटी चौकशी आणि दडपशाही केंद्रातील भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यातूनच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूड बुद्धीने करावाई करण्यात आली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशी राणी चौकात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भाजपकडून सुडाचे राजकारण केले जात आहे. भाजप नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

हेही वाचा :  देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन, देशविदेशातील धावपटूंचा सहभाग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Movement in pune pimpri protest action misuse central investigative ysh



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …