majhinews

विश्लेषण : बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचा दबावगट प्रभावी ठरणार का?

– संतोष प्रधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दूरध्वनी करून येत्या रविवारी मुंबईत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्याची कल्पना मांडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा भाजपच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. राज्यांचे अधिकार आणि केंद्रातील भाजप सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपावरून प्रादेशिक पक्षांचे …

Read More »

आजचं राशीभविष्य, गुरुवार, १७ फेब्रुवारी २०२२

मेष:- तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून  सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल. वृषभ:- सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. मिथुन:- राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे …

Read More »

निर्बंध शिथिल करा!; रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना

रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़ करोना निर्बंधांबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे ‘‘देशात करोना रुग्णसंख्येचा आलेख २१ जानेवारीपासून घसरलेला दिसतो़  गेल्या आठवडय़ात …

Read More »

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न; के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबई : बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत़  त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रविवारी मुंबईत येणार आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच …

Read More »

‘पहिली पत्नीच निवृत्तीवेतनासाठी पात्र’

मुंबई : पहिल्या पत्नीपासून कायदेशीर काडीमोड घेतला नसेल आणि तिचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणात दुसरी पत्नी मृत पतीच्या निवृत्तिवेतनासाठी पात्र ठरू शकत नाही. किंबहुना कायदेशीररीत्या लग्न झालेली पत्नीच पतीच्या निवृत्तिवेतनासाठी पात्र असेल, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी एका प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी दिला. पतीच्या मृत्यूनंतर निवृत्तिवेतनाचा लाभ नाकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोलापूर येथील श्यामल ताटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान …

Read More »

दलालांकडून अश्विनीकुमारला पाच कोटी रुपये

डॉ. देशमुख आणि सावरीकर यांनी दलालांना  पाच कोटी ३७ लाख रुपये अश्विनीकुमार यांना देण्यास सांगितले होते. February 17, 2022 12:59:34 am पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा तत्कालीन संचालक अश्विनीकुमार शिवकुमार याला  पाच कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.  जी. ए. टेक्नॉलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी  …

Read More »

इक्बाल कासकरला हजर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे. February 17, 2022 12:44:29 am मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला हजर करण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे.  इक्बालला ठाण्याहून मुंबईला आणण्यासाठीची पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) करावी, असेही …

Read More »

ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी नवीन संघटना

ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने- मोर्चे घेण्यात आले. February 16, 2022 11:51:31 pm मुंबई:  इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणावरून पक्षापासून दुरावलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने या समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये  २५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये समाजाची …

Read More »

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले; रात्री उशिराच घटना

वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. February 16, 2022 11:20:07 pm रात्री उशिराच घटना चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत आहे. काल मंगळवारी रात्री या भागात …

Read More »

VIDEO : विराटच्या सांगण्यावरून रोहितनं घेतला DRS; पंचांनी दिला होता WIDE!

या घटनेवरून रोहित विराटवर किती विश्वास ठेवतो हे पुन्हा एकदा दिसून आलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात कॅरेबियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. भारताचा कप्तान रोहित शर्माने पुन्हा एकदा उत्कृष्ट नेतृत्व केले आणि गोलंदाजांचा चांगला उपयोग करून घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा माजी कर्णधार विराट कोहली रोहितला डीआरएस घेण्यात मदत …

Read More »

डोंबिवलीत महिलेची गळा दाबून हत्या, सोफ्यात लपवून ठेवला होता मृतदेह; पोलीसही चक्रावले

ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी की केली? याचा तपास पोलीस करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरातीलच सोफा सेट मधील पोकळीत भरून ठेवला होता. या महिलेची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास मानपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. सुप्रिया किशोर शिंदे असे मृत …

Read More »

पुणे : ‘मनसे’च्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

२०१७ च्या निवडणुकीत जयश्री मारणे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ च्या निवडणुकीमध्ये कोथरूड भागातून जयश्री मारणे या मनसेमधून निवडून आल्या होत्या.त्यानंतर झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना, जयश्री मारणे …

Read More »

“बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी…” ; नारायण राणेंच्या टीकेवर मिलिंद नार्वेकरांचा पलटवार!

“वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं देखील नार्वेकरांनी राणेंना विचारलं आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली. या वेळी त्यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची देखील खिल्ली उडवल्याचे दिसून आले. तर, राणेंकडून झालेल्या टीकेवर शिवसेनेकडूनही खासदार विनायक विनायक राऊत …

Read More »

VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर आज ४४ वर्षांचा झाला आहे. वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही शुभेच्छा दिल्या, पण त्याची अभिनंदन करण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी ठरली. मायकेल वॉन आणि वसीम जाफर यांची सोशल मीडियावर एक वेगळीच आंबट-गोड केमिस्ट्री आहे. ते …

Read More »

VIDEO : रनआऊटची संधी सोडली, तरीही विकेटकीपरचं होतंय तुफान कौतुक; वाचा कारण!

क्रिकेटला नेहमीच सज्जनांचा खेळ म्हटले जाते आणि हे खेळाडूंनी मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या पद्धतींनी अनेकदा सिद्ध केले आहे. अनेकवेळा खेळाडूंमध्ये वाद झाले असले तरी खिलाडूवृत्तीचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशीच एक घटना सर्वांसमोर आली आहे. आयर्लंड विरुद्ध नेपाळ (IRE vs NEP) या देशांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील सामन्यात खिलाडूवृत्तीचे उदाहरण पाहायला मिळाले.नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने सर्वांसमोर खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण …

Read More »

IND vs WI 1st T20 : रोहित शर्मानं जिंकला टॉस; भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण!

भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ (IND vs WI) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे. दोन्ही संघात टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंची भरणा आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा अतिशय रंजक होण्याची अपेक्षा आहे. आज भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला अगदी सहज विजय …

Read More »

अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा टोला; म्हणाले “मालिकेतील घोडी…”

बैलांच्या पुढं पळायच तर घोडी माग पळत होती; शिवाजीराव आढळराव पाटलांचा टोला अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. त्यांनी केवळ नागरिकांची करमणूक झाली असून मुंबईहून आणलेली ती घोडी होती. ती शेतकऱ्यांची घोडी नव्हती असं देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. “ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी …

Read More »

आधार कार्डचा शोध लाववणारे नंदन निलकेणी वापरत नाहीत व्हॉट्सअप; काय आहे कारण?

नंदन नीलेकणी यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे. नंदन निलकेणी (Nandan Nilekani) यांनी नुकतेच एका ट्विटद्वारे त्यांच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितले की ते व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत नाहीत. सोशल मीडियावर ही बातमी वाचून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. असे खरेच घडू शकते का? नंदन निलेकणी व्हॉट्सअ‍ॅपशिवाय …

Read More »

विश्लेषण : IPLऑक्शननंतर खेळाडूंना पैसे कसे आणि किती मिळतात? जाणून घ्या…

लीगदरम्यान जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला तर काय होतं? वाचा इथे जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक युवा, दिग्गज खेळाडू आतूर असतात. पैसा आणि प्रसिद्धी ही त्यामागची दोन कारणे. यंदा या लीगचा पंधरावा हंगाम. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेलाही मागे टाकू शकेल, इतकी या लीगची व्याप्ती आणि ताकद आहे. यावर्षी ही स्पर्धा अजून …

Read More »

युपी, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना केजरीवाल म्हणाले, “प्रियंका गांधीपण भैय्या…”

हे खूपच लाजिरवाणं; केजरीवालांकडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी भैय्या उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या वक्तव्यावरुन निशाणा साधला असून हे खूपच लाजिरवाणं असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं वक्तव्य चरणजीत सिंग …

Read More »