आर्थिक विवंचनेतही भरीव निधी ; ‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी १७ हजार कोटींची तरतूद


जयेश सामंत-नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकास कामांवर मात्र यंदाही भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मेट्रो तसेच इतर विकास प्रकल्पांसाठी येत्या आर्थिक वर्षांत १७ हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात यात विविध मेट्रो प्रकल्पांकरिता ६६०४ कोटी ६१ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात मोठमोठे प्रकल्प राबविले जात आहेत. मुंबई महानगरातील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी मेट्रोची कामे पूर्ण होऊन प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे तर काही ठिकाणी कामे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. याशिवाय, शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी रस्ते, उड्डाण पूल आणि इतर महत्त्वाचे प्रकल्पही राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २०२१-२२ या आर्थिक वर्षांत ११ हजार ९७१ कोटी २० लाखांचा निधी दिला होता. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १३ हजार ५७७ कोटी ८१ लाखांचा निधीची तरतूद केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधिकरणाने या निधीत वाढ करत १७ हजार ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ७ हजार ६७९ कोटी ९३ लाख रुपयांची तूट येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून अशी तूट प्राधिकरणाला सोसावी लागत आहे. तरीही प्राधिकरणाने कोणत्याही प्रकल्पांना कात्री लावलेली नसून या उलट त्यासाठी कर्ज घेण्याची तयारी ठेवली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :  ठाणे पालिकेच्या भूखंड विक्री घोटाळय़ाची चौकशी ; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

प्रकल्प खर्चाची तरतूद यंदाच्या वर्षांत प्राधिकरणाने प्रकल्पांच्या खर्चासाठी १७ हजार ८ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्पासाठी ७४ कोटी, माथेरान फ्युनीकुलर रेल्वेसाठी २ कोटी, मेट्रो मार्ग- ७ उन्नत पादचारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी अभियांत्रिकी-संरचना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती व प्रकल्प अंमलबजावणीकरिता १३५ कोटी ८५ लाख, सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान पादचारी झुलता पूल प्रकल्पासाठी ६७ कोटी, विविध मेट्रो प्रकल्पांकरिता ६६०४ कोटी ६१ लाख, मोनो रेल प्रकल्प तसेच भूसंपदानासाठी १५६ कोटी ८६ लाख, वांद्रे-कुर्ला संकुलात सुधारणा व नागरी सुविधांसाठी (कलानगर उड्डाणपुलासह) १३८ कोटी ३६ लाख, विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी १ हजार ३९१ कोटी ४६ लाख, मुंबई पारबंदर छन्नमार्ग – शिवडी ते न्हावाशेवा जलसेतू प्रकल्पासाठी ३ हजार २७० कोटी, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकासाठी २०० कोटी, वरळी ते शिवडी (पूर्व पश्चिम) उन्नतमार्ग प्रकल्पांसाठी ६०० कोटी, मुंबई महानगर प्रदेशात बाह्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी ५९ कोटी, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचे विस्तारीकरणासाठी २५१ कोटी, पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाची दुरुस्ती व देखभालसाठी ११५ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ३०० कोटी, ठाणे ते बोरिवली सहा पदरी भुयारी मार्गासाठी १५० कोटी, प्रादेशिक स्तरावर जलस्रोताच्या विकासासाठी ( सूर्या आणि काळू प्रकल्प ) ९५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा :  अभिनेता अल्लू अर्जुनने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली फोटो शेअर करत, म्हणाला…

The post आर्थिक विवंचनेतही भरीव निधी ; ‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी १७ हजार कोटींची तरतूद appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …