majhinews

नवाब मलिकांच्या अटकेची बातमी कळताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; पाच मिनिटांच्या चर्चेत म्हणाल्या….

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याबाहेरही हे प्रकरण पोहोचल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी शरद पवार यांना फोन करत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी …

Read More »

“हिरोला नग्न दाखवू शकत नाही…, स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं न्यूड पोस्टरवर वक्तव्य

स्मिता पाटील यांनी ‘चक्रा’ या चित्रपटातील त्यांच्या सेमी न्यूड पोस्टरवर हे वक्तव्य केले होते. आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. सशक्त व उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. स्मिता यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी फक्त हिंदी नाही तर बंगाली, …

Read More »

“ज्या ज्या मंत्र्यांना अटक होईल, त्यांना…”, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा!

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जवळपास ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

“२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. २०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले, असा आरोप …

Read More »

ICC Rankings : सूर्यकुमार यादव पुन्हा चमकला; व्यंकटेश अय्यरची गरुडझेप!

भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली, ज्याचा त्यांना क्रमवारीतही फायदा झाला आहे. भारताने नुकतीच संपलेली तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकली होती. भारताकडून या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या तर अय्यर दुसऱ्या स्थानावर राहिला. सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-२० …

Read More »

“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांनी मलिक यांनी ईडीच्या कार्यालयात नेले. त्यांनर नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण अंडरवर्डशीही संबंधित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. यावर केंद्रीय मंत्री …

Read More »

Video- उर्वशी रौतेलाच्या मानेवर लव्ह बाइटच्या खुणा? काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग असलेल्या उर्वशीच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आताही उर्वशीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यावरून उठलेल्या अफवांवर उर्वशीने संताप व्यक्त केला आहे. उर्वशीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मानेवर दिलेल्या खुणा या लव्ह …

Read More »

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर …

Read More »

नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही लढाई…”

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर …

Read More »

Video : भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील मंत्री… असा आहे नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

राज्याच्या कॅबिनेटमध्ये अल्पसंख्यांक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील …

Read More »

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिकांनंतर आता पुढचा नंबर…”

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक …

Read More »

Viral Video: मालकिणीचं पोपटावरचं प्रेम पाहून कुत्रा भडकला, बेडवरून उठला आणि शिकवला धडा

पाळीव प्राणी आणि पक्षी म्हटलं काही जणांचं जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकांच्या घरात एकापेक्षा जास्त पाळीव प्राणी पक्षी पाहायला मिळतात. पण अनेकदा मालकाचं एकाप्रती असलेलं जास्त प्रेम पाहून प्राण्यांमध्ये जळकी वृत्ती तयार होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पोपट आणि कुत्रा यांच्यात जुंपल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या कळेल की मालकीण पोपटाचे लाड करताना …

Read More »

तब्बल ४ वर्षांनी सोनाली बेंद्रे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, फोटो पोस्ट करत म्हणाली…

९० च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेला ओळखले जाते. सोनाली बेंद्रेला चार वर्षापूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. कॅन्सरच्या उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली होती. तसेच यादरम्यान तिचे केसही गळाले होते. पण आता सोनाली कॅन्सरमधून बरी झाली आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रे तब्बल ४ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक …

Read More »

“…झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चे चाहते झाले उदयनराजे भोसले; पाहा व्हिडीओ

उदयनराजे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदयनराजे यांची हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर त्यांना या कार्यक्रमात पाहत असताना त्यांच्या चाहत्यांनी पुष्पाचा डायलॉग म्हणण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांच्या Truth Social मीडिया अ‍ॅपची क्रेझ, अनेक जण वेटिंगवर तर काही जणांवर प्रतिबंधांत्मक कारवाई

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अ‍ॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अ‍ॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्विटरपेक्षा अधिक मनमोकळेपणाने लोकं आपली बाजू मांडू …

Read More »

ED च्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी BJP ची उमेदवारी; रोहित पवार म्हणतात, “आम्ही सांगेल ती कामं…”

ईडीचे सहनिर्देशक राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब …

Read More »

‘मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा…’ रणबीर कपूरसोबतच्या नात्यावर आलियानं सोडलं मौन

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे चाहत्यांचं लक्ष हे दोघं लग्न कधी करतात याकडे लागून राहिलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. पण आता आलियानं या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं यावर भाष्य केलं. आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट …

Read More »

IPL 2022 : नव्या इनिंगची सुरुवात..! मुंबईकर अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

आगरकर २०११ ते २०१३ दरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकरची दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो अनेक गोष्टींमध्ये आपली भूमिका बजावू शकतो. आगरकर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यासह नेतृत्व गटाचा भाग असू शकतो. त्यात फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण अमरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांचाही समावेश आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, मोहम्मद …

Read More »

“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी…”; अमोल कोल्हेंनी कविता शेअर करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

या कवितेतून अमोल कोल्हेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची …

Read More »

१६ वर्षांपूर्वी रुग्णालयातून नवजात बाळ गेलं होतं चोरीला, असं शोधलं आई वडिलांनी आपल्या मुलाला

रुग्णालयातून बाळ चोरी होण्याच्या घटना काही नविन नाहीत. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अनेकदा चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात यश मिळतं. पण काही वेळेला बाळ शोधणं कठीण होतं. लहान बाळ आई वडिलांसाठी काळजाचा तुकडा असतो. लहान बाळाला थोडी जरी इजा झाली तरी वेदना होतात. मॅक्सिकोत राहणाऱ्या यासिर मॅशिअल आणि रोजलिया लोपेज यांनाही अशा प्रसंगातून जावं लागलं. २००५ या वर्षी या …

Read More »