इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन; पाहा व्हिडीओ

Varun Dhawan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरुणचा  भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

वरुण आणि क्रिती हे त्यांच्या ‘भेडिया’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इव्हेंटसाठी जयपूरमधील एका कॉलेजमध्ये पोहोचले होते. कॉलेजमधील विद्यार्थी क्रिती आणि वरुणला पाहण्यासाठी उत्सुक होते. यादरम्यान या इव्हेंटमध्ये एक मुलगी बेशुद्ध पडली. हे पाहून वरुणने मुलीला मदत करण्यासाठी कार्यक्रम थांबवला. एवढेच नाही तर बेशुद्ध मुलीला शुद्धीवर आणण्यासाठी वरुणनं स्वतः स्टेजवरून खाली उतरून तिला पाणी दिले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. नुकताच या इव्हेंटमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकरी वरुणचं कौतुक करत आहेत. 

हेही वाचा :  Kirstie Alley : एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्स्टी एली यांचं वयाच्या 71 व्या वर्षी निधन

पाहा व्हायरल व्हिडीओ: 

भेडीया या चित्रपटात वरुण आणि क्रिती यांच्यासोबतच दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी आणि पॉलिन कबाक या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिनेश विज्ञान यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुण आणि क्रितीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 16: वरुण आणि नताशाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन? बिग बॉसच्या मंचावर सलमाननं दिली हिंट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …