हार्दिक-नताशाने किस करत गाजवली संगीत नाईट, फोटो तुफान व्हायरल

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकने १४ फेब्रुवारीला जयपूरमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आणि या लग्नसोहळ्याचे फोटो खूपच मनमोहक आणि नजरेला समाधान देणारे आहेत. अजूनही त्यांच्या लग्नातील सोहळ्याचे फोटो हार्दिक आणि नताशा पोस्ट करत असून नुकतेच संगीत सोहळ्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा अत्यंत सुंदर दिसत आहेत. कसा होता या संगीत सोहळ्याचा लुक पाहूया. (फोटो सौजन्य – @hardikpandya93 Instagram)

​नताशाचा पेस्टल ग्रीन लेहंगा​

​नताशाचा पेस्टल ग्रीन लेहंगा​

संगीत सोहळ्यासाठी नताशाने पेस्टल ग्रीन रंगाची निवड केली होती तर त्यावर ऑल व्हाईट हेव्ही एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. या लेहंग्याचे केप स्लीव्हज ठेवण्यात आले. या लेहंग्यामध्ये नताशा एका परीसारखी दिसत असून तिच्याकडे पाहतच राहावे असा तिचा लुक आहे. हार्दिक आणि नताशा हातात घालून एंट्री घेताना दिसून येत आहेत.

​हार्दिकचा स्टडेड लुक​

​हार्दिकचा स्टडेड लुक​

हार्दिकने नेव्ही ब्लू रंगाचा ब्लू स्ट्रिप्ड कुरता आणि पायजमा घातला असून कुरत्यावर त्याने व्हाईट डिटेलिंग असणारे एम्ब्रॉईडेड जॅकेट घालून लुक पूर्ण केला आहे. बिअर्ड लुकमध्ये हार्दिक अत्यंत हँडसम दिसत असून दोघांच्याही जोडीला नजर न लागो असेही चाहते म्हणत आहेत. तर ‘आयुष्यभरासाठी माझी डान्सिंग पार्टनर’ असे म्हणत हार्दिकने फोटो पोस्ट केले आहेत.

हेही वाचा :  अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय

(वाचा – सिद्धार्थची कियारावरून नजरच हटेना, कियारा म्हणतेय काहीतरी वेगळी अशी विशेष होती ती रात्र)

​नताशाच्या हिऱ्यांच्या दागिन्यांचा लुक​

​नताशाच्या हिऱ्यांच्या दागिन्यांचा लुक​

या म्युझिकल नाईटमध्ये नताशाने लेहंग्यासह हिऱ्यांचे दागिने मॅच केले आहेत. तिने गळाबंद नेकलेस आणि कानात टॉप्स घातले आहेत. हा लुक तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे. नताशा या लुकमध्ये अत्यंत रॉयल दिसत आहे.

(वाचा – सैराट झालं जी…रिंकूच्या देशी लुकवर चाहते फिदा, म्हणतात इन्स्टाग्रामची क्वीन)

​नताशाचा नैसर्गिक मेकअप​

​नताशाचा नैसर्गिक मेकअप​

संगीत सोहळ्यासाठीही नताशाने अत्यंत नैसर्गिक असा मेकअपच निवडला आहे. अत्यंत हेव्ही अशा लेहंग्यासह नताशाने न्यूड मेकअप निवडला असून हायलायटर, लिपस्टिकसह लुक पूर्ण केला आहे. सुंदर दिसण्यासाठी गडद मेकअपची गरज नाही हे नताशाकडे पाहून लक्षात येते.

(वाचा – दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात रेखाचा बोलबाला, ‘मलमली तारूण्य’ म्हणावे असे आरस्पानी सौंदर्य, आलिया पडली फिकी)

​हार्दिक आणि नताशाची डान्सफ्लोरवर धमाल​

​हार्दिक आणि नताशाची डान्सफ्लोरवर धमाल​

हार्दिक आणि नताशाने डान्स करताना मात्र अगदी मनापासून डान्स केलेला दिसून येत आहे. कारण क्रेप जॅकेट आणि हार्दिकने एम्ब्रॉयडरी असणारे जॅकेट काढून ठेवत अगदी धमाल डान्स केला असल्याचे या फोटोवरून दिसून येत आहे.

हेही वाचा :  Maharashtra Politics: शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी कधी? यावेळची सर्वात मोठी अपडेट समोर

​डान्सफ्लोअरवर केले Kiss​

-kiss

नताशा आणि हार्दिकने लॉकडाऊनमध्ये अगदी साधे कोर्ट मॅरेज केले होते. तर आता मोठे लग्न करून दोघांनीही धमाल केली असल्याचे दिसून आले. अत्यंत फॅशनेबल आणि रॉयल अशा या लग्नात संगीत नाईटला दोघांनी किस करत एकमेकांवरील प्रेमही व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

नताशा आणि हार्दिकच्या पेहरावावरून तुम्हीही प्रेरणा घेऊन फॅशन करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …