ओले केस विंचरायचे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत नाहीतर टक्कल पडल्याशिवाय राहणार नाही

बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना लहान वयातच केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वांना आपल्याला आपल्या केसांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपण केसांना वेगवेगळे हेअर ऑइल, सिरम लावत परंतु अनेकदा आपल्याला आपल्या केसांची काळजी घेता येईलच असं नाही. त्यामुळे काहीतरी उपाय करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या केसांची काळजीही नीट घेता येत नाही. दिवसाची सुरुवात घाईघाईने होते. आपल्यापैकी अनेकांना काळजी असते की केस ओले असताना कंगवा फि रवायचा की नाही फिरवायचा? या विवंचनेत असतात. जाणून घेऊया की नक्की यावर तज्ज्ञांचे काय मतं आहे. (फोटो सौजन्य :- istock)

तज्ज्ञांचे मते

तज्ज्ञांचे मते

तज्ज्ञांच्या मते, केस ओले असताना कुठल्याही परिस्थितीत केसांवरून कंगवा फिरवू नका कारण कंगवा फिरवल्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केसगळतीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी कंगवा ओल्या केसांवरून फिरवू नये. काहींना असे वाटते की जर का आपण ओल्या केसांवरून कंगवा फिरवला तर केस मोकळे होतात.परंतु तसे नसते उलट त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागू शकते.

हेही वाचा :  What to Avoid After Coffee : कॉफीनंतर ही ८ औषधे कटाक्षाने टाळा, नाहीतर डोक्यावर राहिल मृत्यूची टांगती तलवार

(वाचा :- Beauty tips : हट्टी Blackhead ला ‘या’ उपायांनी मुळासकट काढून टाका, चमकदार त्वचेसाठी एकदा नक्की वापरा)

केस होतात कमजोर

केस होतात कमजोर

ओले केस हे फारच कमजोर असतात. त्यामुळे आपल्याला केसांची योग्य ती निगा त्या वेळात राखणं अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे जर का तुम्हाला कंगवा फिरवायचाच असेल तर तो ओल्या केसांमधून फिरवू नका तर थोडा वेळ थांबा आणि मग तुमचे केस वाळले की मग केसांवरून कंगवा फिरवा. जेणे करुन कमीत कमी केस तुटतील.

(वाचा :- क्रांती रेडकरने शेअर केला Hydra Facial चा व्हिडीओ, जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार) ​

केस पांढरे का होतात?

केस पांढरे का होतात?

चुकीची जीवनशैली आणि बाहेरचं जेवण खाल्यामुळे अनेकांना लहान वयातच केस गळणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केस तज्ञ यासाठी अनेक कारणं असतात, असं सांगतात. प्रत्येकाची केस गळण्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण त्यांपैकी एक म्हणजे चुकीच्या पद्धतीने केस विंचरण्याची सवय.

(वाचा :- पांढऱ्या केसांच्या समस्येने हैराण आहात? मग हा नैसर्गिक घरगुती उपाय ट्राय कराच १० रुपयांत मिळतील काळे घनदाट केस)​

हेही वाचा :  तुम्हीही लग्नाआधीच पायात पैंजण घालत आहात का? मग हे जाणून घ्याच

कोणता कंगावा वापरा

कोणता कंगावा वापरा

जेव्हा तुमचे केस ओले असतात तेव्हा ते एकमेकांसोबत चकटलेले असतात त्यामुळे त्यातून कंगवा फिरवलात तर मोठ्याप्रमाणात केस गळू शकता. जर तुमच्या कंगव्याचे दात लहान असतील तर तुम्हाला त्याचा विपरित परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे निदान तुम्ही जर का ओल्या केसांमधून कंगवा फिरवणार असाल तर निदान तुमच्या कंगव्याचे दात तरी मोठे असावेत. दिवसानं 2-3 वेळा तरी कंगवा फिरवावा त्यातून केसांना तेल लावणंही अत्यंत महत्त्वाचे आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त …