लाल साडीत सजली नवरी नताशाच्या सौंदर्याने भारावून गेला हार्दिक, हिंदू पद्धतीने लग्न पडले पार

कोर्ट मॅरेज आणि व्हाईट वेडिंगनंतर आता हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशाचे हिंदू विधीनुसार झालेल्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. हार्दिकने आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर नताशाच्या ब्रायडल लुकसाठी हजारो कमेंट्स येत आहेत. हिंदू रितीरिवाजानुसार करण्यात आलेल्या या लग्नात नताशाने लाल रंगाची साडी फेरे घेताना नेसली तर वरमाळा घालताना गोल्डन लेहंग्याचा लुक केला होता. नताशा आणि हार्दिकने कोरोना पँडेमिक दरम्यान कोर्ट मॅरेज केले होते. पण अशा मोठ्या सोहळ्यात लग्न करण्यासाठी दोघांनीही वाट पाहिली होती. त्यामुळे या दोन्ही लुकवरून चाहत्यांची नजरच हटत नाहीये. पाहूया हा लुक कसा होता. (फोटो सौजन्य – @hardikpandya93 Instagram)

​अबू जानी-संदीप खोसलाने डिझाईन केला गोल्डन लेहंगा​

​अबू जानी-संदीप खोसलाने डिझाईन केला गोल्डन लेहंगा​

Designer Abu Jani And Sandeep Khosla: हार्दिक आणि नताशाने राजस्थानमध्ये १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी पुन्हा लग्न केले. दोन दिवसांपूर्वी व्हाईट वेडिंगचे फोटो दोघांनी पोस्ट केल्यानंतर आता हार्दिकने हिंदू पद्धतीनुसार केलेल्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या रितीरिवाजाचे पालन करताना नताशाने डिझाईनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेले हेव्ही जरदौजी कढाईसह गोल्डन रेड रंगाचा लेहंगा घातला होता.

हेही वाचा :  अमिताभ बच्चन यांच्या लाडक्या लेकीचे लग्नातले कधीही समोर न आलेले फोटो, श्वेता बच्चनने व्हाईट लेहेंग्यात वेधले सर्वांचे लक्ष

​डिझाईनर ओढणीने वेधले लक्ष​

​डिझाईनर ओढणीने वेधले लक्ष​

यावर गोल्डन लेहंग्यावर लाल रंगाची ओढणी घेतली होती. पूर्ण घुंगट खाली ओढून नव्या नवरीसारखीच नताशा मंडपात आल्यानंतर हार्दिकची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिच्या या आऊटफिटसह प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि डबल दुप्पटा डिझाईन करण्यात आला होता. तर यासह हेव्ही पोलकी दागिने नताशाच्या लुकमध्ये अधिक भर घालत होते. हा फ्लेअर्ड असा लेहंगा अत्यंत सुंदर दिसत होता.

(वाचा – साधेपणा आणि एलिगंट लुक यांचे समीकरण म्हणजे समंथा रूथ प्रभूची स्टाईल, सौंदर्याने केले सर्वांना घायाळ)

​हार्दिकची गोल्डन रंगाची शेरवानी​

​हार्दिकची गोल्डन रंगाची शेरवानी​

नताशाला मॅच होईल अशा गोल्डर रंगाच्या शेरवानीमध्ये हार्दिकही अत्यंत हँडसम दिसत होता. तर नताशाच्या मंडपातील प्रवेशानंतर हार्दिकची उत्सुकता फोटोमध्ये दिसून येत आहे. आयुष्यातला हाच तो सुवर्णक्षण हेच हार्दिकच्या डोळ्यातून दिसून येत आहे.

(वाचा – छोटीशी साईशा भोईर फॅशन स्टाईलमध्ये देतेय अभिनेत्रींना मात, निरागसतेवर आहेत लाखो फिदा)

​एम्बेलिश्ड ब्लाऊजसह नताशाने नेसली लाल साडी​

​एम्बेलिश्ड ब्लाऊजसह नताशाने नेसली लाल साडी​

सात फेऱ्यांच्या वेळी नताशाने हिरव्या आणि नारिंगी बॉर्डरची लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती. यामध्ये नताशा खूपच सुंदर दिसत होती. तर नताशाकडे पाहून कोणीही तिला परदेशी म्हणणार नाही इतकं भारतीय सौंदर्य ठासून भरलं होतं. तर तिच्या या साडीसह तिने भरभक्कम डिझाईन असणार ब्लाऊज स्टाईल केला होता. या ब्लाऊजच्या स्लिव्ह्जवर स्फटिक आणि सोनेरी लटकन डिझाईन करण्यात आले होते.

हेही वाचा :  PM Modi Speech: 58 मिनिटांत 79 वेळा टाळ्यांचा कडकडाट, मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे

(वाचा – व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिक पांड्याने नताशा सोबत केले लग्न, व्हाईट कपड्यात स्वप्नाहून सुंदर फोटो समोर)

​सॉफ्ट मेकअप आणि लाल टिकली​

​सॉफ्ट मेकअप आणि लाल टिकली​

नताशाने लग्नाच्या वेळी अत्यंत सॉफ्ट आणि नॅचरल मेकअप निवडला होता. तर मिनिमल मेकअपसह तिने लाल साडी नेसून कपाळावर लाल टिकली लावली होती. परफेक्ट भारतीय नवरीचा लुक नताशाला खूपच शोभून दिसत होता. कोणाचीही नजर तिच्यावरून हटत नव्हती.

​परफेक्ट वधू-वर लुक ​

​परफेक्ट वधू-वर लुक ​

हार्दिक आणि नताशाने आपल्या लग्नाच्या सोहळ्याची कितीतरी वर्षे वाट पाहिली होती. त्यामुळे या लग्नसोहळ्यात हिंदू पद्धतीनुसार विवाह करताना वधू-वर दोघांचाही पेहराव परफेक्ट होता आणि ‘एक-दूजे के लिए’ अशीही ही जोडी मॅच होताना दिसून आली. तर लग्नातील दोघांचीही फॅशन ऑन-पाँईंट होती असंच म्हणावं लागेल.

आम्हाला तर हार्दिक आणि नताशाचा लग्नाचा हा लुक आवडला आहे. किमान पेस्टल रंगातून काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. तुम्हाला आवडला की नाही हा लुक?

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …