‘प्रेमाच्या रंगात न्हाऊनी’…हार्दिक आणि नताशाचा हळदी – मेहंदीचा लुक, नजर ना लगे!

क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविकने उदयपूरमध्ये पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. स्वप्नातील राजकुमार अथवा राजकुमारी भासावी असाच पेहराव दोघांनीही लग्नात केला होता. आता हार्दिकने नताशासह हळदीचे आणि मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. काही वेळात हे फोटो तुफान व्हायरल झाले असून दोघांवरूनही नजर हटत नाहीये. (फोटो सौजन्य – @hardikpandya93 Instagram)

हार्दिक – नताशाचा स्टनिंग लुक

हार्दिक - नताशाचा स्टनिंग लुक

हार्दिक आणि नताशाच्या हळदीचे आणि मेहंदीचे लुक हार्दिकनेच स्वतः सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. दोघेही अत्यंत स्टनिंग दिसत असून भारतीय लुकला दोघांनीही प्राधान्य दिले आहे. तर दोघांच्याही चेहऱ्यावरून नजर हटत नाहीये. हार्दिक नताशा अत्यंत आनंदी दिसत असून याच क्षणाची वाट पाहात असावेत असं दिसून येतंय.

​वडील-मुलाचे ट्विनिंग​

​वडील-मुलाचे ट्विनिंग​

हार्दिक आणि मुलगा अगस्त्य या दोघांनीही गडद गुलाबी आणि पांढऱ्या स्ट्रिप्सच्या कुरत्याचे ट्विनिंग केले होते. वडील आणि मुलगा दोघेही हँडसम दिसून येत आहेत. तर अगस्त्यनेदेखील आपल्या आई-वडिलांच्या लग्नात खूपच धमाल केली असल्याचे दिसून येत आहे. कॉटन आणि मलमलचा असा हा कुर्ता दोघांनाही आकर्षक दिसून येत आहे.

हेही वाचा :  एकदिवसीय सामने सुरु होण्याआधीच भारतीय संघाला धक्का, जसप्रीत बुमराह मालिकेतून बाहेर, वाचा नेमकं

(वाचा – कोण म्हणेल माधवीला खलनायिका? कातिल अदांवर चाहते फिदा)

​नताशाचा प्रिटेंड फ्लॉवरी लुक​

​नताशाचा प्रिटेंड फ्लॉवरी लुक​

नताशानेही प्रिंटेड फ्लॉवरी लुक असणारा टॉप पँट आणि त्यावर गळाभर शालटाईप माळांचा टॉप घेतला आहे. त्यात हार्दिक आणि अगस्त्याच्या कुर्त्याशी मॅच असणारा रंगही आहे. पण अत्यंत क्लासी आणि एलिगंट लुक नताशाचा दिसून येत आहे. सध्या झालेल्या सेलिब्रिटी लग्नांमधील हा नक्कीच वेगळा हळदी लुक म्हणावा लागेल.

(वाचा – दिशाने केले असे फोटो पोस्ट की पाहातच राहावे, ग्लॅम डॉलवरून नजरच हटेना!)

​हार्दिकच्या गळ्यात दिसून आला इटरनिटी नेकलेस​

​हार्दिकच्या गळ्यात दिसून आला इटरनिटी नेकलेस​

हार्दिकला दागिन्यांची खूपच आवड आहे हे नेहमीच पाहण्यात आले आहे. तर त्याने लग्नातही कुर्त्यावर चांगला दिसेल असा इटरनिटी नेकलेस घातल्याचे दिसून आले. यामध्ये हिरेदेखील असतात.

(वाचा – प्रसाद ओकची खऱ्या आयुष्यातील ‘चंद्रमुखी’ आहे खूपच स्टायलिश, साड्यांचे कलेक्शन पाहून म्हणाल हीच खरी ‘चंद्रा’)

​नताशाचा नो ज्वेलरी एलिगंट लुक​

​नताशाचा नो ज्वेलरी एलिगंट लुक​

नताशाने हळदीचा लुक करताना अतिशय साधा पण क्लासी एलिंगट लुक केला आहे. तिने केवळ हातात अंगठी आणि केस मोकळे सोडून त्यावर बिंदी लावली आहे. पण हळद लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील उजळपणा आणि आनंद लपता लपत नाहीये.

हेही वाचा :  सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ

​कुटुंब रंगलेय हळदीत​

​कुटुंब रंगलेय हळदीत​

नताशा, हार्दिक आणि अगस्त्य यांचे कुटुंब हळदीच्या आणि मेहंदीच्या या कार्यक्रमात रंगल्याचे दिसून येतेय. तर अतिशय मिनिमल मेहंदी नताशाने हातावर काढली आहे. तर अगस्त्य हा प्रत्येक कार्यक्रम मजेत एन्जॉय करताना दिसून येत आहे.

​हार्दिक आणि नताशाचे Forever प्रेम​

-forever-

हार्दिक आणि नताशाचा हा फोटो पाहून ते एकमेकांसाठी आयुष्य जगत आहेत असं दिसून येत आहे. प्रत्येकवेळी मॅचिंग कपडे करायची गरज नाही तर मन जुळली की सर्व काही जगात दुय्यम असतं. केवळ प्रेमापोटी एकत्र राहणं गरजेचे आहे हेच या दोघांबघून जाणवते. नजर न लागो असंच शेवटी म्हणावेसे वाटते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …