व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिक पांड्याने नताशा सोबत केले लग्न

भारताचा धमाकेदार क्रिकेटर हार्दिक पांड्या यांनी मंगळवारी, १४ जानेवारी २०२३ रोजी डान्सर नताशा स्टॅनकोविक हिच्याशी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. या रॉयल वेडिंग नंतर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये नताशा आणि हार्दिकच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात गेले आहे. या फोटोमध्ये नताशा तिच्या पतीसोबत नाचत एन्ट्री करत आहे. वास्तविक पाहता हार्दिक आणि नताशाची 2020 मध्ये एंगेजमेंट झाली होती. पण कोविडच्या काळात त्यांनी घरीच छोटा लग्नसोहळा आयोजित केला होता. नताशा जुलैमध्ये आई झाली होती. त्यामुळे हा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला होता. या रॉयल वेडिंगमध्ये नताशाने पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता, तर हार्दिकने काळ्या सूटामध्ये एन्ट्री मारली आहे. (फोटो सौजन्य:- @hardikpandya93)

​Natasa Stankovic चा लुक

natasa-stankovic-

या रॉयल व्हाईट वेडींगमध्ये नताशाने पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. या सुंदर गाऊनचा कट देण्यात आला होता. या कटमध्ये नेटचे नक्षीदार कापड वापरण्यात आले होते. यामुळे तिचा लुक खूपच सुंदर वाटत होता.
(वाचा :- विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत)

हेही वाचा :  हसीन दिलरुबा.. प्राजक्ता माळीचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो पाहून चाहते गपगार

हर्ट नेकलाईनने दिला भन्नाट लुक

हर्ट नेकलाईनने दिला भन्नाट लुक

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी पुन्हा लग्न करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे निवडला. लग्नानंतर दोघांनीही सुंदर फोटो शेअर केले. यामध्ये नताशाच्या गाऊनला हार्टशेपमध्ये नेकलाईन देण्यात आली होती. या गाऊनमध्ये नताशा आगदी एखाद्या परीप्रमाणे भासत आहे. तुम्ही देखील एखाद्या पार्टीला अशी नेकलाईन असणारा गाऊन परिधान करु शकता. यामुळे तुम्ही ग्लॅमरस दिसू शकता.

सिंपल ज्वेलरीने वेधले लक्ष

सिंपल ज्वेलरीने वेधले लक्ष

या सुंदर गाऊनवर नताशाने गळ्यामध्ये मोत्यांचा सुंदर नेकलेस परिधान केला होता. तर कानात देखील मोत्यांचे कानतले घातले होते. या लुकमध्ये नताशा खूपच सुंदर दिसत होती. कमीत कमी दागिने वापरुन तिने हा लुक पूर्ण केला.
(वाचा :- किंग खानची लाडकी लेक सुहानाचा बॉडीकॉन व्हाईट ड्रेसमध्ये कहर, जणू काही बाहुलीच)

‘रॉयल’ वेडिंग

हेअरस्टाईलने दिला हटके लुक

हेअरस्टाईलने दिला हटके लुक

या सुवर्णदिनी नताशाने तिचे केस वरती टाय करत त्यांचा अंबाडा परिधान केला होता. तर बटा सोडून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने मिनीमल मेकअप केला होता. तिच्या लुकवरून हार्दिक पांड्याची तर नजरच हटत नव्हती.

हार्दिक पांड्याचा Dapper Look

-dapper-look

या आनंदाच्या दिवशी हार्दिक पांड्याने ब्लॅक रंगाचा थ्रीपिस कोट परिधान केला होता. हार्दिक पांड्याने ख्रिश्चन परंपरेनुसार साजेसे दिसणारे कपडे यावेळी परिधान केले होते. यामधील एका फोटोमध्ये तो नताशाला तिच्या एंगेजमेंट रिंगसह देत आहे. या दोघांचे फोटोपाहून तुम्ही देखील हरखून जाल.

हेही वाचा :  भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मध्ये चुरशीची टक्कर, कसा आहे आजवरचा इतिहास?

क्युट नोट केली शेअर

क्युट नोट केली शेअर

लग्नानंतर दोघांनीही सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिले आहे त्यात लिहले आहे की “आम्ही तीन वर्षांपूर्वी एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली होती. आता तो पुन्हा व्हॅलेंटाईन डेला साजरा करत आहोत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हा प्रसंग कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करायला मिळाला. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद.”

(वाचा :- बस्ती का हस्ती… गळ्यात मोठं लॉकेट, व्हाईट गोल्ड चेन, कुरळ्या केसात MC Stan चा Swag वाला लुक)

हार्दिक पांड्या आणि नताशाचं लग्न

हार्दिक पांड्या आणि नताशाचं लग्न

लॉकडाऊनमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशाने घाईघाईत घरी लग्न केले. त्यानंतर जुलै 2020 मध्ये दोघेही पालक झाले. हार्दिक आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे. अगस्त्य देखील या सुंदर क्षणांचा साक्षीदार झाला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …