रेड लेदर जंपसूट, एअरपोर्ट लुकची अशी कमाल की चाहत्यांची मलायकावरून नजर हटेना

मलायका अरोरा नेहमीच आपल्या लुक आणि स्टाईलसाठी चर्चेत असते. अर्जुन कपूरसह नात्यात असणाऱ्या मलायकाकडे नेहमीच चाहत्यांचे लक्ष असते. नुकतीच मलायका वॅलेंटाईनच्या डे च्या दिवशी एअरपोर्टवर रेड लेदर जंपसूटमध्ये स्पॉट करण्यात आली. मलायकाचे हे स्टायलिश फोटो सध्या व्हायरल होत आहेत. बॉलीवूड स्टार्सचा एअरपोर्ट लुक हा नेहमीच अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल असतो. मलायकाचा हा लुक कसा होता पाहूया. (फोटो सौजन्य – योगेन शाह)

​रेड लेदर जंपसूट​

​रेड लेदर जंपसूट​

मलायकाने एअरपोर्ट लुकसाठी रेड लेदर जंपसूटची निवड केली आहे. वॅलेंटाईनच्या दिवशी परफेक्ट सूट होणारा असा हा रंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यातही मलायकाच्या स्टाईलमुळे या जंपसूटला अधिक शोभा आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

​मोकळे केस आणि काळा गॉगल​

​मोकळे केस आणि काळा गॉगल​

मोकळे केस आणि ब्लॅक शेड्स अशा या मलायकाच्या लुककडे पाहिल्यानंतर ‘तेनू काला चष्मा जचता है’ याच गाण्याच्या ओळी डोक्यात परफेक्ट बसत आहेत. साधा आणि तरीही एलिगंट, स्टायलिश असा लुक मलायकाचा दिसून येत आहे. त्यामुळे चाहत्यांची नजर तिच्यावरून हटतच नाहीये.

हेही वाचा :  Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला

(वाचा – गालावर खळी डोळ्यात धुंदी, ‘फुलराणी’ प्रियदर्शिनीचा काळजाचा ठाव घेणारा लुक)

​परफेक्ट फिगर​

​परफेक्ट फिगर​

मलायकाने घातलेल्या जंपसूटमध्ये तिची परफेक्ट फिगर दिसून येत आहे. वयाच्या ४७ वर्षीही इतकी सुंदर आणि आकर्षक फिगर मलायकाने योगा करून राखून ठेवली आहे. तर जंपसूटमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर घातली गेली आहे.

(वाचा – डॅझलिंग शिमरी साडी आणि डीप नेक ब्लाऊज, काजोलच्या सौंदर्याने तरूणही घायाळ)

​नैसर्गिक मेकअप​

​नैसर्गिक मेकअप​

मलायकाने रेड लेदर जंपसूटसह अत्यंत नैसर्गिक असा मेकअप केला आहे. न्यूड लिपस्टिक आणि बेसिक मेकअप असा तिचा लुक असून तिच्या नैसर्गिक सौंदर्यानेच चाहते घायाळ झाले आहेत. तसंच तिच्या चेहऱ्यावरील चमक पाहूनही तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण जात आहे.

(वाचा – कियाराच्या मंगळसूत्राच्या किमतीत येईल एक फ्लॅट, सिद्धार्थने केले इतके कोटी खर्च, सब्यासाचीने केले डिझाईन)

​दिली खास पोझ​

​दिली खास पोझ​

मलायका अत्यंत मूडमध्ये असावी असंच तिच्या फोटो आणि स्टाईलवरून दिसून येत आहे. एअरपोर्टवर मीडिया फोटोग्राफर्सने तिने अत्यंत प्रेमाने बाय करत पोझ दिली आहे.

तुम्हीही मलायकाची स्टाईल पाहून त्यावरून प्रेरणा घेऊ शकता. एअरपोर्टच नाही तर अन्य ठिकाणीदेखील असा लुक तुम्हाला वाहवा मिळवून देईल.

हेही वाचा :  अंगभर कपडे घालूनही मलायकावर भडकले चाहते, म्हणाले “अगं लाज बाळग…”

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …