भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मध्ये चुरशीची टक्कर, कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होत आहे. पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (JSCA Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेऊ शकतो आणि मालिकेतील पुढील सामन्यात अधिक चांगली कामगिरी करु शकेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ…

आजवरच्या इतिहासाचा विचार करता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे. येथे भारताने 12 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. या सामन्यांचे निकाल पाहता येथे टीम इंडियाचा काहीसा वरचष्मा दिसत असला तरी आज एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळू शकतो. दरम्यान न्यूझीलंडचा संघ गेल्या 11 वर्षांपासून भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये किवींनी शेवटची टी20 मालिका भारतीय भूमीवर जिंकली होती. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला आला, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने 2-1 ने जिंकली. आणि 2021 च्या मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला होता. ज्यामुळे आजही भारत सामना जिंकल अशी आशा चाहत्यांना आहे.

हेही वाचा :  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? 'ही' आहेत पराभवाची 5 कारणे

कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

  
अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर -शुभमन गिल, ईशान किशन

मिडिल ऑर्डर फलंदाज – सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा

ऑलराउंडर- हार्दिक पांड्या (कर्णधार),  दीपक हुडा, 

गोलंदाज – कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …