India vs New Zealand : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता टी20 चा थरार, सर्व माहिती एका क्लिकवर

New Zealand tour of India : भारतीय संघानं (Team India) नव्या वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर असून वन-डे मालिका 3-0 ने गमावल्यावर आता टी20 मालिका खेळणार आहे. उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

भारतानं न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 8 गडी राखून जिंकल्यावर तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमक दाखवली. शुभमनंचं द्वीशतक ते सिराजचं एकदिवसीय गोलंदाजाच्या क्रमवारीत टॉप करणं अशा बऱ्याच खास गोष्टी यावेळी घडल्या. दरम्यान आता टी-20 मालिकेत भारत हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू घेऊन उतरणार असून नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगं असेल…तर भारत आणि न्यूझीलंड टी20 सामन्याची माहिती पुढीलप्रमाणे…

 कधी, कुठे पाहू शकता सामना?

हेही वाचा :  IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, दुसरा डाव खेळण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

एकदिवसीय सामन्यानंतर टी20  सामने

 

एकदिवसीय सामन्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध तीन टी20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष्य देत असल्याने टी20 सामन्यांच्या मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर सध्या जाहीर केलेल्या संघातील खेळाडू कोणते ते पाहू…

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:







सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  27 जानेवारी 2023 रांची
दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ
तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …