KL Rahul Wedding: राहुलला विराट कोहलीने BMW तर धोनीनं निंजा बाइक दिली भेट, किंमत काय?

KL Rahul Wedding : स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री आथिया शेट्टी खंडाळ्यात लग्नबंधनात अडकले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकरांसह काही क्रिकेटरनेही लग्नाला हजेरी लावली होती. न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय मालिका असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंना लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. केएल राहुलला अनेकांनी लग्नात महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये विराट कोहली आणि धोनी यांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं BMW गाडी भेट म्हणून दिली तर धोनीनं निंजा बाइक दिली आहे. 

कोहलीनं दिली कोट्यवधीची गाडी – 

न्यूझीडंलविरोधात एकदिवसीय मालिका सुरु असल्यामुळे विराट कोहलीला लग्नाला उपस्थिती लावता आली नाही. पण केएल राहुल आणि आथियाला विराट कोहलीनं कोट्यवधींची BMW गाडी भेट म्हणून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या BMW गाडीची किंमत 2.17 कोटी रुपये इतकी आहे. विराट कोहली आणि राहुल यांच्यात चांगली मैत्री आहे, ती अनेकदा दिसूनही आली आहे.  
धोनीनं दिली बाइक –

हेही वाचा :  न्यूयॉर्क शहराहून तिप्पट मोठा हिमनग जहाजासमोर येताच चुकला काळजाचा ठोका; पुढे जे काही घडलं त्याचा थरारक Video समोर

विराट कोहलीप्रमाणेच माजी कर्णधार एमएस धोनी यानं राहुलला महागडं गिफ्ट दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, धोनीनं राहुलला कावासाकी निंजा बाइक गिफ्ट केली आहे. या बाइकची किंमत 80 लाख रुपये इतकी आहे. माजी कर्णधार धोनी बाइकचा मोठा चाहता आहे. त्याच्याकडे जगभरातील टॉप गाड्या आहेत. 

 
पुढील महिन्यात मैदानावर परतणार राहुल –

केएल राहुल पुढील महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बांगलादेश दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत राहुलनं भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. राहुल फलंदाजीत फ्लॉप ठरला होता. परिणामी वनडे आणि टी 20 मधील उप कर्णधारपद काढून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात राहुल पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  भारतीय क्रिकेटपटूंना बॉलिवूडची भूरळ! राहुलच्या आधी या खेळाडूंनी बांधली अभिनेत्रींसोबत लग्नगाठ

आणखी वाचा :
KL Rahul Athiya Shetty Wedding: कुणी दिलं दीड कोटींचं डायमंड ब्रेसलेट, तर कुणी दिला 50 कोटींचा फ्लॅट; राहुल-अथियाला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू
Photos: राहुल-अथियाला लग्नात काय काय गिफ्ट मिळाले?Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …