Video : वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड, पापाराझींच्या गराड्यात केला अभिनेत्रीचा बचाव!

Samantha Ruth Prabhu, Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या साऊथ क्वीन समंथासोबत (Samantha Ruth Prabhu) दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनासोबतचा त्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता समंथा रुथ प्रभूसोबत स्पॉट झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ‘चौकीदार धवन’  म्हटले आहे. तर, त्याची ही प्रोटेक्टिव्ह शैली पाहून काहीजण प्रभावित होत आहेत आणि त्याला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

नुकतेच वरुण धवन आणि समंथा प्रभू मुंबईच्या अंधेरी भागामध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्यासोबत दिग्दर्शक राज निदिमोरूही होते. कलाकारांना एकत्र पाहून पापाराझींनी त्यांना घेरले, त्यानंतर वरुण धवननेही यात धमाल करण्याची संधी सोडली नाही. त्याने पापाराझींपासून वाचवत समंथाला कारपर्यंत नेले आणि ‘अगं तू घाबरू नकोस..’, असे म्हटले.

पाहा व्हिडीओ :

समंथा आणि वरुण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी समंथा ग्रे-ब्लू कलरच्या जॅकेटमध्ये, तर वरुण ऑरेंज कलरच्या टी-शर्टमध्ये दिसला.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. वरुण आणि समंथाच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ‘आधी रश्मिका आणि आता समंथा, वाह वरुण भाई मजा आली’, ‘वरूण तू साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट करणार आहेस का?’, ‘साऊथला जाण्याचा प्रयत्न करत आहेस का’, अशा कमेंट सोशल मीडिया वापरकर्ते करत आहेत. तर, समंथाला वाचवताना तिला स्पर्शही होऊ न दिल्याबद्दल अनेकांनी वरुणचे कौतुकही केले आहे. वरुण धवन आणि समंथा एकत्र एखादा चित्रपट किंवा मालिका करणार आहेत, असा अंदाज अनेकजण लावत आहेत. तर, दोघेही लवकरच अॅमेझॉन प्राइमच्या ‘सिटाडेल’ या सिरीजमध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :  Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणारी दिव्या भारती!

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …