तुमकूरच्या ज्युनिअर कॉलेजमधील गेस्ट लेक्चरर असलेल्या चांदनीने हिजाबच्या वादामुळे राजीनामा दिला आहे. त्या हिजाब परिधान करुन कॉलेजला जात होत्या. मात्र धार्मिक कपडे परिधान करुन शिक्षण संस्थेच्या आवारात येण्यास उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंदी आहे. त्यामुळे चांदनी यांना प्रवेश नाकारण्यात आला. आणि त्यांनी आपला राजीनामा संस्थेकडे सोपावला.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चांदनी या जैन प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात गेस्ट लेक्चर होत्या. कॉलेजच्या प्राचार्यांनी तिला हिजाब परिधान करण्याच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी नकार दिला. हिजाब काढण्याच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा समोर आला आहे.त्या मागच्या तीन वर्षांपासून कॉलेजमध्ये हिजाब परिधान करुन येत होत्या. १६ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना त्यांनी राजीनाम्याचे पत्रात लिहिले. या पत्रानुसार, ‘मी तुमच्या महाविद्यालयात ३ वर्षांपासून हिजाब परिधान करुन येत आहे. माझा हिजाब काढण्याची मागणी तुम्ही मला केली होती. त्यामुळे मी इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक पदाचा राजीनामा देत आहे. मी तुमच्या अलोकतांत्रिक कृत्याचा निषेध करत आहे. धर्माचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. जो कोणीही नाकारू शकत नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन करत शाळा-कॉलेज अधिकारी सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिजाब, बुरखा आणि भगवी शाल असे धार्मिक कपडे बाहेर उतरवून प्रवेश दिला जात आहे. यामध्ये शिक्षक वर्गाचाही समावेश आहे. हिजाब बंदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश लागू राहणार आहे. दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्याच्या अल्पसंख्याक कल्याण विभागाने वर्गात हिजाबसह धार्मिक कपडे आणि प्रतिके परिधान करण्यास बंदी घातली आहे.