युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॅट्यू, पाहा फोटो

सध्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत आहे. या चर्चा अभिनेत्रीने पाठिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टॅट्यू काढल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

या अभिनेत्रीचे नाव नतालिया कोझीनोवा आहे. तिने हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ती मूळची युक्रेनची असून तिच्याकडे युक्रेनचं नागरिकत्व आहे. सध्या नतालिया तिच्या अंगावर असणाऱ्या टॅट्यूमुळे चर्चेत आहे. २०१५ साली पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा टॅटू पाठीवर काढल्यामुळे नतालिया चर्चेचा विषय ठरली होती. भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने या टॅटूद्वारे व्यक्त केला होता.

२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नतालिया पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. त्यासोबतच तिने ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’, ‘तेरे जिस्म से जान तक’ या चित्रपटात काम केले आहे. अल्ट बालाजीवरील ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये नतालिया बोल्ड सीन देताना दिसली होती. लवकरच ती ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा :  नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …