लाइफ स्टाइल

अमेरिकेत भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळलं; घरात सापडले पती-पत्नीसह दोन्ही मुलांचे मृतदेह

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या …

Read More »

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, पुढच्या चार दिवसात कुठे पडेल पाऊस? IMD चे अपडेट

Monsoon Return Journey : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवेतील आर्द्रता कमी झाली आहे (Maharashtra Weather Forecast). भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दुपारी जाहीर केले की, शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून माघारला आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे. IMD नकाशावरील परतीचा मार्ग सतना, नागपूर, पुणे, मुंबई आणि अलिबागमधून जातो. पुढील दोन …

Read More »

Video : ‘तुम्ही नालायक आहात, देशाची…’, संतापलेल्या नागरिकांसमोर पंतप्रधान ट्रुडोंनी ठोकली धूम!

Canadian PM Justin Trudeau Video : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी भारतावर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तहेर संघटनेचा (R&AW) हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशातील वाद टोकाला पोहोचला अन् भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील संबंध ताणले गेले. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. …

Read More »

तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

Relationship Tips : स्त्री असो पुरुष आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याबद्दल प्रत्येकाची आपली अशी कल्पना असते. प्रत्येक तरुणीला किंवा महिलेला आपल्या जोडीदारामधील वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. मुळात तरुणाने आपल्याला राणी सारखं ठेवावं, त्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा साधारण तरुणींची असते. एखाद्या तरुणाशी किंवा पुरुषाशी ओळख झाली की त्याच्याबद्दलचे गुणधर्म आणि स्वभाव समजतो. पण पहिल्या नजरेत महिलांना किंवा …

Read More »

सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

Trending News: इंटरनेटवर कधी कधी विचित्र घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी युजर्स अशा काही करामती करतात की त्यांवर कोणालाही विश्वास ठेवणे कठिण जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियातील जेनिफर एवरसोल हिने केलेली करामत पाहून युजर्सनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर, तिने केलेला प्रकार पाहून लोकांनी तिला सगळ्यात मूर्ख व्यक्ती हा पुरस्कार ही देऊ …

Read More »

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : काही दिवसांपूर्वी रायगडच्या अलिबाग तालुक्‍यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं (Drugs Seized) आढळून आली होती. त्यामुळे ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या शिंदे पळस्पे भागात मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त करण्यात आलाय. या कारवाईत …

Read More »

पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मोफत मिळणार ‘एक पुणे विद्यार्थी पास’, असा मिळवा पास

Pune Metro Pass: पुणेकरांसाठी मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवास सुकर झाला आहे. मेट्रो प्रशासनाने आता विद्यार्थ्यांसाठी एक खास घोषणा केली आहे. पुणे मेट्रोकडून विद्यार्थ्यांना एक खास पास मिळणार असून पुणे मेट्रोनं एक पुणे विद्यार्थी पासची घोषणा केली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचा प्रवास आरामदायी व सुकर होणार आहे. नक्की काय आहे ही योजना व त्याच्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार हे जाणून घेऊया.  पुणे …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक  यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य …

Read More »

पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

Trending News In Marathi: सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. देशाच्या छोट्याशा खेड्यात घडलेली एखादी घटनाही लगेचच समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हे तर आपण प्रत्येकजण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळकरी मुलींचे वागणे विचित्र असल्याचे दिसत आहे. या मुलींनी भयंकर आजाराने ग्रासले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केन्या देशातील …

Read More »

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात…

Mumbai Local Train News: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने …

Read More »

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि  हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे.  रणबीर कपूरनं ईडीकडे दोन आठवड्यांची वेळ …

Read More »

Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, ‘झोपेचे सोंग घेऊन…’

Supriya sule On Nanded Incident : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded hospital) 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या दिड दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. त्यानंतर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी डीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत मृतांची संख्या 41 वर गेली असून रुग्णालयात पुरेसा औषध साठा आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने मृत्यू …

Read More »

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा की अजित पवारांचा?

Ajit Pawar vs Sharad Pawar:  शरद पवार, अजित पवार यांना उद्या निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. मात्र उद्या या सुनावणीला शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार गटाने 9 हजार शपथपत्र आयोगाकडे सादर केलीयत. अजित पवारांच्या गटाने 5000 शपथपत्र दाखल केली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. उद्या आयोगासमोर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. समर्थन …

Read More »

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Trending News In Marathi: अलीकडच्या काळात जोडीदारासोबत ओळख वाढवण्यासाठी किंवा त्याला नीट पारखून घेण्यासाठी डेटवर जातात. किंवा पहिल्यांदा जोडीदाराला भेटत असतानाही त्यांच्यासोबत डेटवर जातात. एखादे रेस्तराँ, पार्क, रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये भेटतात. इथे खाणे-पिणे आणि फिरण्याव्यतिरिक्त एकमेकांची ओळख वाढते आणि नाते पुढे नेण्यास मदत होते. मात्र, एका तरुणासोबत भलताच प्रकार घडला आहे. तरुण जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला मात्र तिथे …

Read More »

जपानमध्ये नेहमीच क्लीन शेव्ह का असतात पुरूष? हे आहे कारण

Japanese Boys Beards: जपान देशातील नागरिकांच्या चेहऱ्याची ठेवण एका विशिष्ट्य प्रकारची असते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर जपानी नागरिक कधीच दाढी वाढवत नाहीत. अशावेळी तुम्हाला जपानमध्ये नागरिक दाढी का वाढवत नाहीत नेहमीच क्लीन शेव्ह का करतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. जपानी नागरिक जाणुनबुझून दाढी ठेवत नाहीत की हे अनुवंशिक आहे. तसं पाहायला गेलं तर थंड प्रदेश असलेल्या प्रदेशात …

Read More »

दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर नेमकी कुठून आली? अखेर झाला खुलासा, ‘प्राणी तस्करीचा…’

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी मगरीचे पिल्लू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. ही मगर शेजारीच असणाऱ्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचा आरोप मनसेने केला होता. यानंतर वनविभागाने या प्राणीसंग्रहालयावर धाडही टाकली होती. दरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सीसीटीव्ही शेअर केलं असून, ही मगर शेजारच्या प्राणीसंग्रहालयातूनच आल्याचं सिद्ध केलं आहे.  संदीप …

Read More »

‘अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ’ हे ऐकताच फडणवीस म्हणाले, ‘जो राजकारणात…’

Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच फडणवीस यांनी या विषयावरुन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण स्पष्टपणे काय ते सांगितलं आहे असं म्हटलं आहे. …

Read More »

‘अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू’, फडणवीसांचं विधान! शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, ‘6 महिन्यात…’

Devendra Fadnavis On Making Ajit Pawar Chief Minister: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना भाजपाच राज्यातील दादा पक्ष असेल असं म्हटलं होतं. यानंतर आता फडणवीस यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. भाजपा अजित पवारांना योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री बनवणार असल्याचं …

Read More »

धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया महिन्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल 20 हजार मानसिक रूग्ण (mental disorders) आढळल्याने खळबळ उडाली आहे. झोप न येणे, निराश वाटणे, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना …

Read More »

मुंबईत एकही डास दिसणार नाही; BMC ने प्लानच असा जबरदस्त बनवलाय की…

mumbai municipal corporation : पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंगी आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात विशेष शोध मोहीम राबविली आहे. या शोध मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या कीटक नाशक विभागाने जानेवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ लाख ६ हजार ८९८ डेंगी आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत. नागरिकांनीदेखील त्यांच्या …

Read More »