लाइफ स्टाइल

शिकवण्याच्या बहाण्याने 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली:  हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अवघ्या 7 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एका सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. याप्रकरणी या अल्पवयीन आरोपी विरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात …

Read More »

अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप

मयूर निकम, झी मीडिया Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी या डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे. पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तीन आरोपींविरोधात विनयभंगाची आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिळालेल्या …

Read More »

Covid Strain : Eris जगाची चिंता वाढवणार? WHO कडून नवा स्ट्रेन ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित!

Eris Covid 19 : तब्बल 2 वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर संपूर्ण जगाचं जीवन पुर्वपदावर येत होतं. अशातच आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. ब्रिटनच्या काही भागात कोरोनाच्या एक नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय. कोविडचा हा नवीन प्रकार EG.5.1 ला Eris असं नाव देण्यात आलंय. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचाच एक स्ट्रेन असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता जागतिक …

Read More »

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर…

व्यवसाय म्हटलं की त्यात स्पर्धा असते. या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असावं किंवा अपेक्षित यश मिळावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जेव्हा आपल्या तुलनेत स्पर्धक व्यावसायिकाला जास्त यश मिळतं तेव्हा मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्यातून काही अघटित घटना घडण्याची भीती असते. असाच काहीसा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या तुलनेत जास्त गर्दी होत असल्याने एका …

Read More »

भांडण दोघांचे राग तिसऱ्याला आला अन्… नाशिकमध्ये तरुणांची निर्घृण हत्या

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) शहरात सशस्त्र तरुणांनी भररस्त्यात दोन जणांना भोसकून त्यांचा दिवसाढवळ्या खून केला आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. टोळक्याच्या हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोर सीसीटीव्ही …

Read More »

Pune Crime: आधी लैंगिक अत्याचार वर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून ‘तसले’ व्हिडिओ व्हायरल

Pune Crime: कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत पीडित पोलीस स्थानकाची पायरी चढतात. येथे आपल्याला न्याय मिळेल याची त्यांना खात्री असते. पण पोलीस स्थानकात न्याय मागायला गेली म्हणून तरुणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अर्जुन मुंडे असे या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय …

Read More »

देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम

उमेश परब, झी मीडिया Bioluminescent Fungi In Sindhudurg: कोकणातील (Kokan) सौंदर्य हे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालत असते. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालत असतो. तर, आंबोली घाटात (Amboli Ghat) सर्वात जैवविविधता आढळले. अशातच वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावात एक अनोखी वस्तू सापडली आहे. वेंगुर्ल्यात चमकणारी अळंबी (मशरुम) (Glowing Mushroom) आढळली आहे. राज्यात प्रथमच चमकणाऱ्या अळंबीची नोंद झाली आहे. …

Read More »

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Marriage Viral News : हे प्रत्येकाला माहिती आहे प्रेम आंधळं असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काहीच दिसत नसतं. प्रेमात वय, रंग, जात धर्म काहीच पाहिलं जात नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र लग्नाची (amazing marriage) गोष्टी तुफान व्हायरल ( Viral News) होते आहे. वयस्कर नवरा आणि तरुण बायको असे अनेक जोडपे आपण पाहिले आहेत. पण इथे शाळेतून सुट्टी घेत 16 वर्षांचा …

Read More »

‘मनरेगा’ अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

MGNREGA Job 2023: आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महात्मा गांधी …

Read More »

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू …

Read More »

ऐन गणेशोत्सवात कांदा रडवणार, गृहिणींचे बजेट कोलमडणार; किती असेल भाववाढ?

Onion Price Hike: टोमॅटो, आलं आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडल्यानंतर आता गृहिणींना कांदाही रडवणार आहे. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांद्याशिवाय जेवण अपूर्ण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता कांद्याचे भावही वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुरवठा कमी होत असल्याने या महिन्याच्या अखेरील 60 ते 70 किलोने वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सव काळात …

Read More »

लग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं

Man Ditches Honeymoon: लग्नानंतर हनीमून हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीत क्षण असतो. हीच तीच वेळ असते जेव्हा पती-पत्नी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतात. पण काहीवेळा या आनंदाच्या प्रसंगावर विरजन पडतं. हनीमुनला (Honeymoon) गेलेल्या एका जोडप्याबरोबरच अशीच एक विचित्र घटना घडली. एक तरुण आपल्या नववधूबरोबर हनीमूला गेला. सुरुवातीचे एकदोन दिवस त्यांचे आनंदात गेले. यदरम्यान पत्नीने आपल्या लग्नाचा अल्बम (Wedding Album) पतीला …

Read More »

लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

वैभव बालकुंदे झी मीडिया लातूर : राज्यात डोळे येण्याची साथ (conjunctivitis symptoms) सुरू असून जिल्ह्यातही या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर जिल्ह्यात (Latur News) या साथीचे चार हजार 64 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन हजार 514 रुग्ण उपचाराअंती पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने घरी उपचार सुरू आहेत. डोळे येणे हा साथरोग असून याबाबत लहान मोठ्या …

Read More »

शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : राज्यात सर्वाधिक घोटाळे शिक्षण क्षेत्रात होत असल्याचं समोर येत आहे. आता असाच एक घोटाळा नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (Yashwantrao Chavan Open University) उघडकीस आला आहे. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र विद्यापीठात प्रवेश न घेता  विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र (Bogus Certificates) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक मधील यशवंतराव चव्हाण …

Read More »

गोड बोलून हॉटेलवर नेले, बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार

Pune News Today: नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणार्‍या तरुणीवर बंदूकीच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी, राहुल चंद्रकांत यादव (वय.32,रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.   24 जुन 2023 रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास बाणेर येथील एका हॉटेलवर ही घटना घडली असल्याची तक्रार ३० …

Read More »

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात …

Read More »

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा …

Read More »

आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, ‘मदत राहुल गांधींनीच केली’

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : 2008 साली केंद्रात काँग्रेसची (Congress) सत्ता असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विधवा कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (monsoon session) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेमध्ये कलावती बांदूरकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे त्या नक्की कोण आहेत अशी चर्चा …

Read More »

भारी इंग्रजीत मेल लिहायचांय? Gmail नं आणलं खास फीचर

नवी दिल्ली : Gmail Latest Feature : आजकाल सर्वच क्षेत्रात जगभरात इंग्रजी ही भाषाच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर काम करताना खास करुन मेल लिहिताना फारच समस्या येऊ शकतात. त्यात मेल लिहायचा असेल तर तो फक्त इंग्रजीतच लिहावा, त्यामुळे समोरचा माणून कोणत्याही भाषेचा असेल तरी त्याला तो कळतो आणि तुमचाही समोरच्यावर अधिक ठसा उमटू …

Read More »

यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख

Who Is Kalavati Bandurkar: महाराष्ट्रातील जलन्यामधील एका गरीब विधवा महिला शेतकऱ्याचा उल्लेख बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये केला. या महिलेचं नाव आहे, कलावती बांदूरकर! अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करताना राहुल गांधींना लक्ष्य केलं. 2008 साली महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये यवतमाळमधील कलावती यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार …

Read More »