Video : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, ‘झोपेचे सोंग घेऊन…’

Supriya sule On Nanded Incident : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded hospital) 21 वर्षीय बाळंतीण आणि तिच्या दिड दिवसाच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. त्यानंतर रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी डीनवर गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत मृतांची संख्या 41 वर गेली असून रुग्णालयात पुरेसा औषध साठा आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. या घटनेचे पदसाद राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) देखील उमटत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या वेदना जाणून घेतल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

विष्णुपुरी, नांदेड येथे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. या रुग्णालयात शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. याठिकाणी आज भेट दिली असता नवजात अर्भक गमावलेल्या एका मातेने मिठी मारुन हंबरडा फोडला. तब्बल 12 वर्षानंतर या मातेची कुस उजवली होती पण शासनाच्या दुर्लक्षामुळे ते बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं. या मातेचे आणि आपलं माणूस गमावलेल्या लोकांचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

आपल्या नाकर्तेपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे प्राण गेले तरीही हे सरकार मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करीत नाही. उलट संबंधित मंत्र्यांची पाठराखण करीत आहे. संवेदनशील राज्यकर्ते असते तर आतापर्यंत त्या मंत्र्यांचा राजीनामा झाला असता. पण हा आक्रोश ऐकून घेण्याची शासनाची तयारी नाही. हे असंवेदनशील सरकार झोपेचे सोंग घेऊन पडले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पाहा पोस्ट

आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी देशाच्या ‘जीडीपी’चा किमान 6 ते 8 टक्के हिस्सा त्यांच्यावर खर्च करण्याची गरज आहे. जगातील सर्व विकसित राष्ट्रे हे गेली काही दशकांपासून करीत आहेत. आरोग्य क्षेत्रावर जीडीपीचा केवळ ३ टक्के खर्च करुन भारत ‘विश्वगुरु’ होऊ शकणार नाही.आरोग्यक्षेत्राची हेळसांड करुन भारत विकसित राष्ट्र होऊ शकणार नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

हेही वाचा :  अग्रलेख : धोरण आणि धारणा!

आणखी वाचा – पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! पाहा 133 सेकंदाचा थरारक व्हिडीओ

दरम्यान, शासकीय रुग्णालयांतील उपचार हे एकेकाळी खात्रीशीर मानले जात. रूग्ण येथे विश्वासाने जात असे. कारण डॉक्टर, परिचारिका, सपोर्टींग स्टाफ आणि औषधे उपलब्ध असत. परंतु अलिकडे बहुतेक ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. परिचारीका आणि सपोर्टींग स्टाफची देखील हिच अवस्था आहे. राज्यातील बहुतेक सर्व ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. आवश्यक असणाऱ्या लसी उपलब्ध नाहीत. शासकीय रुग्णालयांची हि अशी दुरवस्था करण्यामागे या संपूर्ण यंत्रणेची विश्वासार्हता कमी करण्याचा डाव तर नाही ना? यासाठीच ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत मृत्युचे हे भीषण तांडव घडवून आणण्यात तर आले नाही ना ? या माध्यमातून मृत्युची भीती निर्माण करुन शासकीय रुग्णालयांचे खासगीकरण करुन ती ठराविक लोकांच्या कंपन्यांना विकण्याचा सरकारचा डाव आहे का? या सरकारचा खासगी क्षेत्राकडे असणारा ओढा लक्षात घेता याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …