ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस बँका बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच जाणून घ्या

Bank holiday in August: शाळा, कॉलेज तसेच नोकरदार वर्गासाठी सुट्टी हा आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येकजण महिन्याच्या सुरुवातीला कॅलेंडरमध्ये कुठे लाल चौकोन आहे का? हे तपासत असतात. नोकरदार वर्गाला बॅंकेची कामे करण्यासाठी ऑफिस आणि बॅंकेच्या वेळा पहाव्या लागतात. दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी असल्या तर बॅंकेची महत्वाची कामे होत नाहीत आणि खूप मोठी गैरसोय होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या बॅंक हॉलिडेबद्दल जाणून घेऊया. 

ऑगस्ट 2023 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीचे कॅलेंडर सूचित करते की ऑगस्ट 2023 मध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यासह बँका 14 दिवस बंद राहतील. ऑगस्ट महिना म्हणजे विविध राज्यांमध्ये सणासुदीला सुरुवात होते.त्यामुळे सुट्टी हा जिव्हाळ्याचा विषय बनून जातो. ऑगस्टमध्ये आठ राज्यात विशिष्ट सुट्ट्या असतील. काही राज्यांमध्ये, तेंडोंग ल्हो रम फाट, पारसी नववर्ष, ओणम, रक्षाबंधन आणि इतर सारख्या विशेष दिवशी सार्वजनिक आणि व्यावसायिक बँका बंद राहतील. 

ग्राहकांना या दरम्यान काही महत्वाची कामे असतील तर त्यांनी सुट्ट्यांचे नियोजन आखून करायला हवीत. असे असले तरी इंटरने, मोबाईल बॅंकींगची सुविधा असेल तर तुम्हाला घरबसल्याही अनेक कामे शक्य आहेत. 

हेही वाचा :  Money Laundering प्रकरणामध्ये Nora fatehi चं वक्तव्य समोर, सुकेश चंद्रशेखरचं काय होणार?

ऑगस्टमधील बॅंक हॉलिडेची यादी 

12 ऑगस्ट: महिन्याचा दुसरा शनिवार

13 ऑगस्ट: महिन्याचा दुसरा रविवार

15 ऑगस्ट: स्वातंत्र्यदिन (आगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद – आंध्र प्रदेश, हैदराबाद – तेलंगणा, इंफाळ, जयपूर, जम्मू, येथे बँका बंद राहतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम)

16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (पारशी नववर्ष साजरे करण्यासाठी बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहतील)

18 ऑगस्ट: श्रीमंत शंकरदेवाची तिथी (श्रीमंत शंकरदेवाच्या तिथीमुळे गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील)

20 ऑगस्ट: तिसरा रविवार

26 ऑगस्ट: महिन्याचा चौथा शनिवार

27 ऑगस्ट: महिन्याचा चौथा रविवार

28 ऑगस्ट: पहिला ओणम (पहिला ओणम साजरा करण्यासाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील)

29 ऑगस्ट: तिरुवोनम (तिरुवोनम साजरा करण्यासाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.0

30 ऑगस्ट: रक्षा बंधन (रक्षाबंधनामुळे जयपूर आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …