दादरच्या स्विमिंग पूलमध्ये मगर नेमकी कुठून आली? अखेर झाला खुलासा, ‘प्राणी तस्करीचा…’

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी मगरीचे पिल्लू आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. ही मगर शेजारीच असणाऱ्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचा आरोप मनसेने केला होता. यानंतर वनविभागाने या प्राणीसंग्रहालयावर धाडही टाकली होती. दरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सीसीटीव्ही शेअर केलं असून, ही मगर शेजारच्या प्राणीसंग्रहालयातूनच आल्याचं सिद्ध केलं आहे. 

संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक सीसीटीव्ही शेअर केलं आहे. यामध्ये मगरीचं पिल्लू शेजारच्या प्राणीसंग्रहालयातून येताना दिसत आहे. “हा घ्या पुरावा. मगर  ही बाजूच्या प्राणी संग्रहालयातूनच आली आहे. हे प्राणी संग्रहालय नसून हा आहे प्राणी तस्करीचा अड्डा आहे,’ असं संदीप देशपांडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

स्विमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू आढळल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. “महात्मा गांधी जलतरण तलावामागे असलेल्या जागेत अनधिकृतरित्या प्राण्यांना ठेवलं जातं. तिथे अजिबात कारवाई केली जात नाही. हे अनधिकृत प्राणी संग्रहालय असून तरणतलावाच्या व्यवस्थापकांनी वारंवार त्यांची केली आहे. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त आहे,” अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली होती. 

“मुंबई महानगरपालिकेचे त्या व्यक्तीसोबत काय लागेबंध आहेत हे माहीत नाही. पण निश्चितच आहेत. कारण, महानगरपालिकेने त्या जागेसंबंधित केस कोर्टात जिंकली आहे. तरीही जागा ताब्यात का घेतली जात नाही. याप्रकरणी आयुक्त इक्बाल सिंग यांची भेट घेऊन ही जागा रिकामी करण्याची मागणी करणार आहे”, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा :  'मुलं एक तास मारत होते, गाल लाल झाले होते' पीडित विद्यार्थ्याने सांगितलं वर्गात नेमकं काय घडलं

नेमकं काय झालं होतं?

रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार 3 ऑक्टोबरला पहाटे तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आल्याची माहिती जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरु असल्याचेही ते म्हणाले.

जुलैमध्ये सापही आढळले

महात्मा गांधी जलतरण तलावात प्राणी सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.जून, जुलैमध्ये सलग दोन महिन्यांमध्ये दोन साप आढळून आले होते. त्यानंतर येथे पोहायला येणाऱ्या सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या जलतरण तलावाच्या ठिकाणी साप येण्याच्या या वारंवारच्या घटनांमुळे याचा शोध महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. यावेळी हे साप बाजुच्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या प्राणिसंग्रहालयातील असावेत असे अंदाज बांधला वर्तविण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी सापांचा वावर होण्यास कोणतेही अनुकूल वातावरण नसताना जर बाजुच्या प्राणिसंग्रहालयातून हे साप सुटून येत असतील आणि त्यांची देखभाल जर संबंधित प्राणिसंग्रहालयाला करता येत नसेल तर ते बंद करण्यात यावे अशी मागणी जलतरण तलावाच्या सभासदांकडून  करण्यात आली होती.

हेही वाचा :  देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …