Maharastra Politics: ‘महाराष्ट्रात खपवून घेणार नाही…’, प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!

MNS criticizes Sanjay Shirsat: शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chartuvedi) यांच्यावर टीका केली होती. ही टीका करताना संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या सौंदर्यामुळे राजकारणात पुढे गेल्या, असं वक्तव्य केलं. हे बोलत असताना शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोपांनी जोर धरलाय. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणाचा (Maharastra Politics) पारा देखील वाढल्याचं दिसतंय.

शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत. प्रबोधन ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत मनसेने संजय शिरसाठ यांच्यावर सडकून टीका केलीये. तसेच गंभीर इशारा देखील दिला आहे.

काय आहे ट्विट 

महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शिर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे!

प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…” त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही… अशांचं ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे असं महाराष्ट्रात प्रचलित होईल.

पाहा ट्विट

शिरसाट म्हणतात, खैरेंना विचारा…

दरम्यान, चारित्र्यहीनतेच्या गप्पा प्रियंका चर्तुर्वेदींनी मारु नयेत. कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, जर आम्ही चारित्र्य काढायला बसलो ना तर बात लंबी चलेगी, अशा शब्दांत शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. सर्वकाही माझ्या तोंडी मारायचं आणि मी अश्लील बोलतो मी चारित्र्यहिनासारखं बोललो, असं म्हणत टार्गेट करायचं. खैरेंना विचारा ते बोलले की नाही? त्यांच्याकडं ऑडिओ क्लीप आहे, अशा शब्दांत शिरसाट यांनी चतुर्वेदींना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता वाद पेटणारची शक्यता दिसते.

हेही वाचा :  खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे बंगल आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …