विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ दिवस शाळा बंद, पहा संपूर्ण यादी

Schools Closed in August: शाळेची सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील शाळेच्या डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे विद्यार्थी एकत्र येऊन तपासताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण  जुलै महिना आज संपत आहे. ऑगस्टमध्ये शाळांना अनेक दिवस सुट्या आहेत. आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात. ऑगस्टमध्ये चार रविवार आहेत, ज्यामध्ये शाळा आपोआप बंद असतात. याशिवाय पडणाऱ्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे आहेत. 

तेंडॉन्ग लो रम फीट सण सिक्कीममध्ये 8 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच मंगळवारी साजरा केला जातो. त्या दरम्यान स्थानिक सरकारने येथे सुट्टी जाहीर केली आहे.

9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आदिवासीबहुल भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. झारखंड सरकारने ९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यानिमित्त शाळांमध्ये ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :  पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर

16 ऑगस्ट 2023 रोजी पारशी नववर्षानिमित्त काही राज्य सरकारांनी सुट्टी जाहीर केली आहे. 

28 ऑगस्ट 2023 सोमवार आहे. केरळमध्ये या दिवशी ओणम साजरा केला जातो. यानिमित्त येथील शाळांना सुट्टी आहे.

केरळमध्ये 29 ऑगस्ट 2023 रोजी तिरुवोनम उत्सव होतो. अशा परिस्थितीत केरळमध्ये 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2023 अशी सलग 3 दिवस सुट्टी असेल. 

30 ऑगस्ट 2023 रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. हा सण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये साजरा केला जातो. या दरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

बुधवार, 30 ऑगस्ट 2023 रोजी ओडिशामध्ये झुलन पौर्णिमा सण साजरा केला जातो. सणाच्या दिवशी राज्य सरकार अनेकदा ऐच्छिक सुट्टी जाहीर करते. 

ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 6, 13, 20 आणि 27 ऑगस्टला चार रविवार येत आहेत. 

ऑगस्ट 2023 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीचे कॅलेंडर सूचित करते की ऑगस्ट 2023 मध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यासह बँका 14 दिवस बंद राहतील. ऑगस्ट महिना म्हणजे विविध राज्यांमध्ये सणासुदीला सुरुवात होते.त्यामुळे सुट्टी हा जिव्हाळ्याचा विषय बनून जातो. ऑगस्टमध्ये आठ राज्यात विशिष्ट सुट्ट्या असतील. काही राज्यांमध्ये, तेंडोंग ल्हो रम फाट, पारसी नववर्ष, ओणम, रक्षाबंधन आणि इतर सारख्या विशेष दिवशी सार्वजनिक आणि व्यावसायिक बँका बंद राहतील. 

हेही वाचा :  80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …