महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, पुढच्या चार दिवसात कुठे पडेल पाऊस? IMD चे अपडेट

Monsoon Return Journey : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवेतील आर्द्रता कमी झाली आहे (Maharashtra Weather Forecast). भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दुपारी जाहीर केले की, शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून माघारला आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे. IMD नकाशावरील परतीचा मार्ग सतना, नागपूर, पुणे, मुंबई आणि अलिबागमधून जातो.

पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तीन ते चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पुढील काही दिवस राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. राज्याच्या ४५ टक्के भागातून मान्सून परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यातून निघून जाईल.

संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील

गेल्या दोन दिवसांत पुणे शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्मा वाढला आहे. शुक्रवारी दुपारी रस्त्यावरून चालताना उन्हाचा तडाखा जाणवतो. रात्री थंडी जाणवते. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे शहरावर धुक्याची चादर कायम होती. दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस मुख्यत: निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान राहील. संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस

जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांमधून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेत आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेऊ शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हेही वाचा :  चहा टाळा, लस्सी प्या, थंड पाण्याने अंघोळ करा, घरातून बाहेर पडताना...; Heat Wave चा सामना करण्यासाठी टीप्स | Heat wave warning issued for Mumbai Thane by IMD Does And Donts for next few days scsg 91



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …