लाइफ स्टाइल

राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized:  राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘दत्तक शाळा’ यनावाखाली सरकारी शाळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात येणार आहे. यावर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले शालेय शिक्षणमंत्री सविस्तर जाणून घेऊया.  राजकारणापासून सगळं सुटलं होत फक्त शिक्षण विभाग राहिला होता …

Read More »

रिक्षावर फणा काढून बसला होता नाग, बदलापूर स्थानकातील व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

Cobra On Autorickshaw Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. साप हे सहसा जंगलात किंवा अडगळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. पण रहदारीच्या ठिकाणी किंवा मानवी वस्तीत साप आढळल्यास एकच खळबळ उडते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रिक्षाच्या मागे एक साप लटकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईलगतच्या बदलापूर स्थानकातील आहे. साप रिक्षाच्या …

Read More »

4 महिन्यातच डिलीव्हरी, जन्मावेळी 328 ग्रॅम वजन; आईच्या तळहातावर मावायची चिमुरडी,पुढे जे झालं…

Smallest Baby: जगाच्या कानाकोपऱ्यात दररोजा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. या घडलेल्या गोष्टी पाहून कधी आश्चर्य, कौतुक तर कधी वाईटही वाटते.ब्रिटनमधील वेल्समध्ये वेगळी घटना समोर आली. ज्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. येथे एका मुलीचा जन्म घेतला असून विशेष म्हणजे तिचे जन्मावेळचे वजन केवळ 328 ग्रॅम आहे. 9 महिन्यांनी डिलीव्हरी होणे अपेक्षित या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला.. मुलीच्या …

Read More »

मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या आईला ट्रकने चिरडलं; मृतदेहाची अवस्था पाहून मुलाने फोडला टाहो

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर :  शनिवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडकल्याने नाशिकच्या 12 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ट्रक चालकाच्या चुकीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईला घरी न्यायला आणलेल्या मुलाने तिचा मृतदेह पाहिल्याने रस्त्यातच हंबरडा फोडला. या घटनेमुळे छत्रपती …

Read More »

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

NASA Moon Mission : मानवाचे चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. अमेरिकेची आंतराळ संस्था NASA चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबवत आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे ध्येय नासाने विश्चित केले आहे. यासाठी आपल्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर  मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅन नासाने  तयार केला आहे. तर, दुसरीकडे वैज्ञानिकांनी सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार …

Read More »

लांब पल्ल्याच्या प्रवासातही नो टेन्शन! ट्रेनमध्ये मिळणार ‘व्रताची थाळी’; IRCTCचा नवरात्री स्पेशल मेन्यू पाहाच

IRCTC Navratri Thali: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व असते. याकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन देवीची विधिवत पूजा केली जाते. याकाळात नऊ दिवस देवीचे उपवासही केले जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने खास सोय केली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) व्रताच्या थाळीचा समावेश केला …

Read More »

‘पोलिसांची जमीन बिल्डरला द्या’; दादा उल्लेख करत IPS मीरा बोरणवणकर यांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

IPS Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात (Maharahstra Politics) आता खळबळ उडण्याची शक्यता आहे. आयपीएस (IPS) अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner) पुस्तकात केलेल्या धक्कादायक दाव्याने राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या पुस्तकात मीरा बोरवणकरांनी त्यावेळच्या पालकमंत्र्यांचा दादा असा उल्लेख करत …

Read More »

Navratri: 900 वर्षे जुन्या दुर्गा देवीच्या मंदिरात तांत्रिक पद्धतीने पूजा, मनातली इच्छा होते पूर्ण

Navratri 2023: शारदेय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभराती देवीच्या मंदिरात दर्शनाला भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती लावलीय. दरम्यान आपण गोड्डाच्या बारकोप येथील 900 वर्षांहून अधिक जुन्या दुर्गा मंदिराचे महात्म्य जाणून घेऊया. या मंदिरात तांत्रिक पद्धतीने पूजा केली जाते.  या शक्तिशाली मंदिरात माता दुर्गा आपल्या भक्तांचे सर्व दुःख आणि दुःख दूर करते, अशी भाविकांची आस्था आहे. त्याचबरोबर शेकडो वर्षे जुन्या या …

Read More »

‘मराठा नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न’; जरांगेंच्या आरोपावर भुजबळ उत्तर देत म्हणाले, ‘जरांगे आता कुणाचं खातोय…’

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालन्यातील सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ मराठा नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. दरम्यान मनोज जरांगे यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. जरांगे आता कुणाचं खातोय तेसुद्धा त्यांनी सांगावं अशा शब्दांत त्यांनी टीकेला उत्तर दिलं आहे.  “मराठा समाज इतका नादान, अशिक्षित आणि असंस्कृत …

Read More »

किंमत 700,000,000,000,000,000,000… NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये…

NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले आहे. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे.  या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आल्यास सगळेच अब्जाधीश बनतील ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ‘येथे’ पाठवा अर्ज

PWD Job 2023:  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होत असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण 2 हजार 109 पदे भरली जाणार आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) …

Read More »

मराठ्यांचा OBC मध्ये समावेश करण्यास विरोध का? भुजबळांनी सांगितलं खरं कारण

Chhagan Bhujbal On Why He Oppose Inclusion Of Maratha In OBC: मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी आज जालन्यातील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर थेट नाव न घेता टीका केली. छगन भुजबळ यांचा मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेण्यास विरोध आहे. तर जरांगेंनी आज कुणबी म्हणून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. जरांगेंनी भुजबळांवर कठोर शब्दांमध्ये टीका …

Read More »

जरांगेंचा सोडणार नाही हा इशारा ऐकून कपाळावर हात मारत भुजबळ म्हणाले, ‘अशी अनेक लोक माझ्या…’

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो असा प्रश्न विचारणाऱ्या छगन भुजबळांवर टीका करताना जरांगेंनी अजित पवारांचा उल्लेख करत छगन भुजबळांना समज द्यावी असंही म्हटलं. याचसंदर्भात भुजबळ यांना प्रश्न …

Read More »

आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू

Israel- Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक जखमी झाले आहेत. Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे.  1 महिन्याचे बाळ आईच्या मृतदेचे दूध पिताना सापडले आहे. दगडाचाही उर भरुन येईल असे हे दृष्य आहे.  या युद्धात 1,900 पॅलेस्टिनी ठार …

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड

MAHA Security Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरतीची …

Read More »

जरांगेंच्या बिनबुडाच्या गोष्टी, त्यांच्या सभेपेक्षा यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी केला पलटवार

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे बोलणे मग्रुरीचे होते. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे. एखाद्या जात समुह म्हणून गलिच्छ राजकारण सुरु आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ही सभा विराट झाली नाही. यात्रा पेक्षा या सभेपेक्षा मोठ्या होतात. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सीमेवरील सैन्याची आहे, ती समाजाची नाही. आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असतं, असेही सदावर्ते म्हणाले. …

Read More »

‘तू मराठ्यांचं रक्त पिऊन…’; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Slams Chhagan Bhujbal Mentioned Ajit Pawar: मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनासाठी पैसा कुठून येतो असा प्रश्न राज्यातील मंत्री आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नाला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून उत्तर दिलं आहे. थेट छगन भुजबळांच्या नावाचा उल्लेख न करता अगदी आपल्या …

Read More »

2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार

Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमास संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी करुन मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रांनी मारा केला जात आहे. इस्रायलमधील आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार इस्रायलमधील 1200 हून अधिक अधिक लोकांची हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्याचं सांगितलं आहे. या …

Read More »

अंधश्रद्धेचा कळस! अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाची अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही अंधश्रद्धेच्या (Superstition) घटना वारंवार उघडकीस येताना दिसत आहेत. अशातच अमरावतीमध्ये (Amravati Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 11 वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने मध्यरात्री अमरावतीच्या टाकळी जहागीर येथील एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आलं आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना काही गावकऱ्यांना या प्रकाराची चुणूक लागल्याने गुप्तधन …

Read More »

राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?

Maratha Aarakshan Who Is Manoj Jarange: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असून सकाळपासूनच या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन …

Read More »