लाइफ स्टाइल

Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. दिवाळीच्या तयारीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या अनेकांनाच पावसानं सळो की पळो करून सोडलं. तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण पट्ट्यासह दक्षिण भागामध्येही पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळू …

Read More »

Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल ‘इतके’ हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!

MMRDA employees grace grants : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी दिवाळीनिमित्त 42,350 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे केली. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. सदर सानुग्रह अनुदान अदा करण्यास मंजुरी देत असल्याचे परिपत्रक एमएमआरडीएचे (MMRDA) आयुक्त डॉ.संजय मुखर्जी …

Read More »

एलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी

Elon Musk Neuralink :  ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. ऍलॉन मस्क यांचा मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.  Elon Musk यांचा स्टार्टअप असलेल्या Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युम ट्रायल होणार. एलॉन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.  अमेरिकन एजन्सी …

Read More »

‘माझ्यासोबत चल’, प्रभादेवी स्थानकावर सर्वांसमोर महिलेशी छेडछाड; रेल्वेने दिलं उत्तर

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावर एका महिलेची छेड काढण्यात आली. स्थानकावर गर्दी असतानाच व्यक्तीने महिलेचा हात पकडला. पीडित महिला बेंचवर बसलेली असताना आरोपी तिच्या शेजारी बसला होता. यावेळी त्याने आक्षेपार्ह कमेंट्स करत तिचा हात ओढला. यानंतर त्याने तिला माझ्यासोबत चल असं म्हटलं. एका दक्ष नागरिकाने हा सगळा प्रकार एक्सवर शेअर केला आहे. यानंतर रेल्वेनेही या पोस्टवर उत्तर दिलं आहे.  आरोपीच्या या …

Read More »

काकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर… पुतण्याचं धक्कादायक कृत्य

Crime News : गेल्या काही वर्षात वाढत्या तंत्रज्ञानासोबत सायबर गुन्ह्यांमध्येही (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तंत्रज्ञानात साक्षर नसणाऱ्यांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. अशातच नाशकात पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला हा सगळा प्रकार कळल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात (Nashik Police) धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या …

Read More »

‘मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील’; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला

Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा शाब्दिक संघर्ष रंगल्याचं चित्र दिसत आहे. ओबीसी नेत्यांपैकी …

Read More »

मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

Mumbai AC Local:  लोकल ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. सकाळी चाकरमान्यांची ऑफिसला जाण्याची गडबड असते. सकाळच्या गर्दीच्या वेळात एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यानची घटना असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घटना घडली आहे.  मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते सीएसएमटी एसी लोकलवर ही दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी 8.33 च्या …

Read More »

‘आरक्षण मिळणार नाही असं वाटतंय’; विजेच्या तारांना स्पर्श करुन मराठा तरुणाने संपवलं जीवन

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) सध्या राज्यात आंदोलन पेटलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलं होतं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने 24 डिसेंबरपर्यंत याबाबत तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. …

Read More »

मेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा…

Mumbai Metro 3: मुंबईत मेट्रो आणि उड्डाणपुलांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेने मेट्राच्या कंत्राटदाराला काही दिवस काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेकडून हे आदेश देण्यात आले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडली आहे. प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसतोय. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून नियमावलीही राबवण्यात आली आहे. काही विकासक आणि …

Read More »

‘तुझं हेल्मेट कुठंय?’ भररस्त्यात महिलेचा पोलिसाला सवाल; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर…

Mumbai Police Viral Video: वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे सगळ्यांसाठी बंधनकारक असतात. दुचाकी चालवत असताना हेल्मेट आणि कार चालवत असताना सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. अशावेळी जर आपल्याकडून नियम पाळले गेले नाही तर दंड आकारला जातो. वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा अधिकारी. सोशल मीडियावर एसाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पोलीस कर्मचारी …

Read More »

8 भाडेकरु घरात असतानाच मालकाने स्वत: लावली घराला आग; समोर आलं धक्कादायक कारण

Home On Fire by Landlord Shocking Reason: अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी एका वयस्कर घरमालकाला टक केली आहे. 8 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका या घरमालकावर ठेवण्यात आला आहे. भाडेकरु भाडं देत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत घरमालक आणि भाडेकरुमध्ये झालेल्या पैशावरुन झालेल्या वादामधून या व्यक्तीने भाडेकरु घरात असता घराला आग लावल्याचं वृत्त हफिंग्टन पोस्टने …

Read More »

कोविड होऊन गेलेल्यांना दिवाळीदरम्यान श्वसन विकाराचा धोका दुप्पट; फटाक्यांपासून दूर राहा!

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मुंबई आणि पुणे येथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरतही दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे डॉक्टर सांगताय. श्वसन विकरांच्या रुग्णांना सामान्यांच्या तुलनेत धोकाही दुप्पट झालाय. दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र वातावरणातील बदल, वाढणारी थंडी अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, त्यात दिवाळीत फटाके व अन्य वायू प्रदूषण …

Read More »

2024 वर्ष अत्यंत भयानक; नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगापेक्षा जास्त डेंजर

Nostradamus Predictions 2024:  रशिया-युक्रेन युद्धानं सा-या जगाची झोप उडवलीय. मात्र कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकित एका भविष्येत्यानं वर्तवलं होतं. या भविष्यवेत्त्याचं नाव आहे नॉस्ट्रॅडॅमस.   2024 वर्ष अत्यंत भयानक असेल. नॉस्ट्रॅडॅमसने केलेली भविष्यवाणी बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीपेक्षा जास्त डेंजर आहे.  अमेरिकेत अंतगर्त कलह अमेरिकेत सध्या पूर्वीपेक्षा जास्त अंतर्गत कलह पहायला मिळत आहेत. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेला अस्थिरतेचा सामना करावा लागू …

Read More »

Video : स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि…

International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर सध्या अनेक अंतराळवीर कार्यकरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच  International Space Station च्या मेंटेनन्ससाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला.  स्पेस वॉक करताना  स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  नेमकं काय घडलं? 1 नोव्हेंबर रोजी स्पेसवॉक करत असताना स्पेस स्टेशनवर विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल …

Read More »

गज कापून 4 कुख्यात कैदी जेल मधून पळाले; ड्युटीवर असलेल्या पोलिसांना कळालेच नाही

Sangmner Crime News : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चार कैदी जेलमधून फरार झाले आहेत. कारागृहाचे गज कापून या कैद्यांनी पलायन केले आहे. संगमनेरमधील कारागृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चार पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना कैदी पळाले आहेत. पोलीसांचा आरोपींना पळविण्यात पोलिसांचा सहभाग तर नाहही याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना …

Read More »

नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले ‘टीव्ही, बाथरुम…’

आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंय या बॅरेकमध्ये पंचतारांकित सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नीरव मोदीसाठी खास बॅरेक तयार करण्यात आलं असून त्यात टीव्ही आणि बाथरूमसह विविध सेवा देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात ‘कसाबच्या यार्डात’ …

Read More »

दिवाळीत गावी जायचंय, पण तिकिट मिळेना; मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-पुण्यातून…

Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीत अनेकांना गावी जाण्याचे वेध लागतात. सण आपल्या माणसांसोबत साजरा करण्याची मज्जा वेगळीच असते. त्यामुळं दिवाळीच्या आधीच आपसूकच चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळू लागतात. मात्र, अनेकदा गावी जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट कॅन्सल होते किंवा आयत्यावेळी तिकिट मिळत नाही आणि सगळा हिरमोड होऊन जातो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची गर्दी …

Read More »

‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा

Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे  Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.  …

Read More »

Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या ‘या’ भागात ढगाळ वातावरण तर, ‘इथं’ पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरीही सध्या त्याची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मान्सूननं माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबईसह (Mumbai Weather) कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह आणखी जाणवू लागला. पण, विदर्भ मात्र याला अपवाद ठरला. कारण, इथं मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट झालं.  हवामान विभागाच्या …

Read More »

Video : भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत तयार झालं नविन बेट; व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

New Island : समुद्राच्या मध्यभागी असलेली एकाकी बेट सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र, या बेटांची निर्मी कशी होते हे कुणीच प्रत्यक्षात पाहिलेला नाही. भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत  नविन बेट  तयार झालं आहे. जपानमधील समुद्रात बेट निर्माण होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित होत आहेत.  लहान मोठी अशी शेकडो बेट या पृथ्वीवर आहेत. …

Read More »